चिकन मंचूरीयन –
साहित्य:
२५० ग्रॅम बोनलेस चिकन, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेली भोपळी मिरची, १ चमचा बारीक चिरलेली कांदापात, २ चमचे बारीक चिरलेला लसूण, २ छोटे चमचे लाल तिखट, १ चमचा टोमॅटो सॉस, १ चमचा सोया सॉस, १ चमचा रेड चीली सॉस, १ चमचा व्हिनेगर (optional), ३-४ चमचे कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, तेल, पाणी, मीठ
कृती:
१. प्रथम एका बाउलमध्ये बोनलेस चिकन घेऊन त्यात १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण, २ चमचे कॉर्न फ्लोअर, २ चमचे मैदा, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून चिकन ५-१० मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे.
२. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करून त्यात मॅरीनेट केलेले चिकन मंद आचेवर तळून घ्यावे.
३. एका पॅनमध्ये २ चमचे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदा टाकून परतून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेली भोपळी मिरची टाकावी आणि २ मिनिटे परतून घ्यावे.
४. एका वाटीमध्ये १ चमचा कॉर्न फ्लोअर आणि ३ चमचे पाणी टाकून पेस्ट करून घ्यावी.
५. नंतर त्यात १ चमचा सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर टाकून परतून घ्यावे. अर्धी वाटी पाणी टाकावे आणि उकळी आल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर ची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यावे.
६. त्यात लगेच मॅरीनेट करून तळलेले चिकनचे पिसेस घालावे आणि २ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावे.
७. गरमागरम मंचूरियन सर्विंग प्लेट मध्ये सर्व करावे वरतून कांदा पात घालावी.
अश्याप्रकारे आपले चिकन मंचूरीयन तयार!
© स्नेहल काळभोर