गर्दी…
गर्दी –
विचारांना प्रवाही ठेवणारी
प्रवाहांच्या दिशा बदलणारी
माणसांचे भोवती गोतावळे
विचारांसाठी रान मोकळे
गर्दी…
बाहेर माणसांची, आत विचारांची
गर्दीतले विचार, गर्दी विचारांची
गर्दी…
बाहेर संभाषणांचा गलका
आत शांततेसाठी भडका
गर्दी…
सगळ्यांना सामावून घेणारी
पण तरीही अनोळखी
माणसांत असूनही
माणुसकीला पारखी
गर्दी…
एक सुख जिवंतपणाचं
गर्दी…
एक दुःख दुरावलेपणाचं
गर्दी…..
-कायांप्रि