पुण्याजवळची ही ५ नितांत सुंदर पर्यटनस्थळे
१. साताऱ्याजवळील ठोसेगर धबधबा
पावसाळ्यात भेट देण्यासारखं हे एक अतिशय मोहक ठिकाण! वारयाबरोबर कोसळणारा धबधबा आणि सोबत विविध आकाराची रंगीबेरंगी फुलांची अद्भुत दुनिया असे कास पठार. या पठारावर मॉन्सूनच्या दिवसात विविध स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात. इथून जवळच असणार्या सज्जनगडावर संत रामदासांची समाधी आहे.या गडावरून फुलांनी आच्छादलेल्या दरीचे दर्शन डोळ्याना सुखावल्याशिवाय राहणार नाही.
२. तपोला
तपोला नगरीला पश्चिम किनार्यावरील “काश्मीर” म्हणून देखील ओळखले जाते. पुण्यापासून तपोला फक्त १५०किमि अंतरावर आहे. एका दिवासाच्या पिकनिक साठी पुण्याच्या जवळपास एखादे स्थळ शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरेल.
ट्रेकिंगच्या छंद असणार्यांसाठी तर हे ठिकाण म्हणजे जणू स्वर्गच! तपोलाच्या घनदाट जंगलातून ट्रेकिंगचा आनंद लुटणे हा निश्चितच एक विलक्षण अनुभव असेल. तपोलाच्या शिवसागर तलावामध्ये बोटिंगचा देखील आनंद देखील लुटू शकता.
३. कामशेत
पुण्यापासून कामशेत फक्त ४८ किमी अंतरावर आहे. अगदी एका दिवसाची ट्रीप देखील प्लान करू शकता. कामशेत परिसरात अनेक जुनी हेमाडपंती बांधकाम असलेली मंदिरे आहेत.
पावना धरणावर उभारलेल्या पावना तलावातूनपतंग उडवणे आणि डान्सिंगचा मनमुराद आनंद लुटू शकता. निसर्ग सौंदर्य आणि वास्तुकलेचा संगम असणारे लोहगड, तिकोना आणि तुंगी यासारख्या किल्ल्यांना भेटी देऊ शकता. शिंदेवाडी टेकडीवरून पॅराग्लाइडिंगचा आनंद लुटू शकता.
४. कर्नाळा
पुण्यापासून कर्नाळा अवघ्या १२४ किमी अंतरावर वसलेलं आहे.
पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्रातील हमखास भेट देण्यासारखं ठिकाण म्हणजे कर्नाळा.
इथे तुम्ही एकेकाळी मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या कर्नाळा गडाचे अवशेष पाहू शकता. हा परिसर गरुड, गिधाड आणि अशाच प्रकारच्या पक्षांच्या दुर्मिळ प्रजातींसाठी राखून ठेवले आहे.
या शिखरावरून तुम्ही मुंबईच्या सागर किनार्याचे आकाश दर्शन घेऊ शकता. सह्याद्रीच्या कुशीतील घनदाट वृक्षराजी तुमच्या नजरेला खिळवून ठेवेल.
५. भिमाशंकर
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर. हे जरी एक धार्मिक क्षेत्र असले तरी, इथल्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडल्यावाचून रहात नाही. इथे तुम्ही भीमाशंकर अभयारण्याला देखील भेट देऊ शकता. या अभयारण्यात शेकरू सारखा एक दुर्मिळ प्रजातीचा प्राणी तुम्हाला पाहायला मिळेल.
शिडी घाटापासून ते गणेश घाटापर्यंत ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता. भीमाशंकरच्या डोंगर दऱ्यातून, पावसाळ्यात उत्स्फुर्त वाहणाऱ्या झर्यांचा आनंद लुटू शकता.