आलू शेव | बटाटा शेव
साहित्य:
१ वाटी उकडलेला बटाटा, 1½ वाटी बेसन, सैंधव, मीठ, १ चमचा तिखट, ½ चमचा काळीमिरी पूड, तेल
कृती:
१. प्रथम एका प्लेटमध्ये उकडलेला बटाटा, बेसन, तिखट, मिरपूड, चवीपुरते सैंधव, मीठ घालून घ्यावे.
२. चांगले एकत्र करून त्याचा गोळा करुन घ्यावा. त्यात एक चमचा तेल घालावे.
३. पुन्हा नीट एकत्र करून घ्यावे आणि मऊसे पीठ करून घ्यावे. गरज वाटल्यास थोडे-थोडे पाणी घालावे.
४. कढईमध्ये तेल घ्यावे आणि तयार पीठ शेवपात्रात घेऊन कढईमध्ये गोलाकार शेव करून घ्यावी.
५. दोन्ही बाजूने मंद आचेवर तळून घ्यावी.
अश्याप्रकारे आपली बटाटा शेव तयार!