सकाळी सकाळी पुण्यातील सोसायटी मध्ये एलियन –
पाटील – (स्पेस शिप कडे पहात बाजूच्या भैय्याला ) अय भय्या !! ते तुझ्यावाणीच दिसतंय, देख पाहुणा है क्या तेरा.
( भैया खी खी लाल दात विचकतो )
बोकील काका – ( ऑफिस ची बॅग खाली ठेवत )श्वान तर नसेल ?
भैया – स्वान ?
पाटील – कुतारड कुतारड…
( एलियन एकमेकांकडे पाहतात )
बोकील काका – पालिकेत फोन लावा कुणीतरी ते पाहतील काय करायच…मी निघतो मला काम आहेत..
पाटील – मंग काय फक्त सल्ला दयायलाच.. येळ काढून थांबलेले का ?
( बोकील काका गप मागे सरकतात )
पाटील – ह्ये बोकाड त नसणं ? नीळ पडलंय …पण वरून कुटून आलेत ??
देशपांडे काकू – अग बाई … नाशिक चे व्याही तर नाही आमचे ? ते बुटकेच आहेत.. केमिकल ची कंपनी आहे त्यांची…
गेलरितून पेपर वाचणारे निकम काका – ( एलियन ला )
ओ ओ तुम्ही…असे डायरेक गेट मध्ये कसे आलात ? एंट्री केली का ? कुणाकडं आलत ?
पाटील – ( वॉचमन कडे बघत ) ह्यो हाल्या कायम झोपलेला असतो…कोण येतय कोण जातंय काय माजा बाप लिहिलं का ?
भैया – मे जाता हू…काम है मुझे…
पाटील – किदर जाता हू.. रुक तू… हमे करमता नहीं…तेरे बिना…तेरा तोंड बगणे तो आते हे हम…सकाळी सुबे पावडर तेल लगाके.
( भैया खी खी लाल दात विचकतो )
बोकील काका – अहो पण यांचं करायचं काय ? बांधून ठेवायचे का पोलीस येई पर्यंत ?
झाडूवाला तात्या – मटण करू…माझं मी नेतो कापतो…
( एक छोटा एलियन मागे सरकतो )
पाटील – नाय नाय एक काम करा आबाला फोन लावा…आय घाला*#ला नगरसेवक केलाय का त्याला….त्याच तो बगण काय करायचं..
देशपांडे काकू – ( एलियन कडे पाहत )अये…नाव काय रे तुमची …रस्ता चुकलात का ? सोसायटी नंबर काय आहे …लक्षात आहे का काही.
गॅलरीतून निकम काका – बांधून ठेवा साल्याना… चोर असतील…
पाटील – ओ निक्कम सकाळी सकाळी काय …सॉस टाकून चहा पिले का ??
देशपांडे काकू – ओ पाटील भाऊ… हाकला की त्यांना… ए शुक शुक निकलो इधर से..जाव बाहेर जाके खेलो
( एलियन तोंड बारीक करतात )
बोकील काका – सोसायटी मीटिंग बोलवा…अस कस कोणीही येऊ शकतं त्यात गाडी थेट आत लावली… नियम काय फक्त आम्हालाच आहेत का ?
पाटील – (माणिकचंद थुकून मनगटाने तोंड पुसून ) तुम्ही चाललेले ना बोकील गेले नाय का ?
भैया – ये एलियन तो नही ? जादू…. जादू…अरे पीच्चर मे आया थाना… रुतिक रोशन के…
पाटील – निघ, तुझ्या आय#₹@
बोकील काका – अक्कल आणि तू एकत्र गाव सोडलं वाटत
देशपांडे काकू – चला बाई मी जाते..
सावंत – अय भैया ..वर ये तुला एलियन दाखवतो.
(सगळे एलियन स्पेस शिप मध्ये बसून काही न बोलता अमेरिकेकडे जातात )
मनोज शिंगुस्ते
( लेखक नासा मधल्या सायंटिस्टच्या भावाचे फेसबुक फोलॉवर आहेत )