सोलापुरातील अष्टविनायक

By Bhampak Travel 2 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

सोलापुरातील अष्टविनायक –

ग्रामदैवतश्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी शहराच्या विविध भागात जशी ६८ लिंगांची स्थापना केली, तशीच शहराच्या अष्ट दिशांना काळभैरव आणि अष्टविनायकही स्थापिलेले आहेत. शहरातील विविध भक्तमंडळ महिन्यातील प्रत्येक संकष्टी मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला पदयात्रा काढतात.

वीरेश तथा वीर गणपती : अक्कलकोटरस्त्यावर आहे. मूर्ती छोटी असून उद्योगपती मोगलप्पा पोगूल यांनी नव्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

बेनक गणपती : अाग्नेयदिशेला जुन्या होटगी -कुंभारी रस्त्यावर एका शिवाराच्या बांधावर बेनक गणपती आहे. बेनक म्हणजे पाठीराखा होय. छोट्याशा गाभाऱ्यात असणाऱ्या मूर्तीचे दर्शन लोटांगण घालून घ्यावे लागते.

धुळी महांकाळ गणपती : दक्षिणदिशेला धर्मवीर संभाजी तलावाच्या समोर श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात धुळी महांकाळ हा तिसरा गणपती आहे. सिद्धरामेश्वरांचे खरे नाव धुळी महांकाळ, विस्मरणात जाऊ नये म्हणून याचे नाव असे आहे.

करी गणपती : हागणपती शहराच्या नैर्ऋत्य दिशेला म्हणजे देगाव गावच्या समोर असलेल्या करीमसाब मुल्ला यांच्या शेतात असणारा हा गणपती. मूर्ती चार फूट उंच असून कन्नडमधील करीगण म्हणजे काळे डोळे असणारा हा गणेश होय. बालकांना नजर लागली असेल तर याच्या दर्शनाने ती निघून जाते असा समज आहे.

वीरकर गणपती : सम्राटचौक परिसरातील देशमुख मळ्यात असणारा हा वीरकर गणपती होय. पश्चिम दिशेला असणाऱ्या या गणपतीचे वैशिष्ट्य असे की, रेखीव चार फूट उंच अशी या गणपतीची मूर्ती आहे. संस्कृतमध्ये वीरकर म्हणजे शूर बाहू असा अर्थ होतो.

वीर – कोलाहल गणपती : वायव्यदिशेला असणारा सहावा भाेगाव येथील वीर-कोलाहल गणपती. अष्टविनायक प्रकारातील ही मूर्ती आहे.

मश्रृम गणपती : ईशान्यदिशेला असणारा सातवा गणपती तळेहिप्परग्याचा मश्रृम गणपती. दही खाणारा अशी याची ख्याती आहे.

अष्टविनायक कामेश्वर गणपती – अष्टविनायककामेश्वर अतिथी गणपती होय. यास शेळगी गणपती असेही म्हणतात. हा शिवानुभव मंगल भवन येथे आहे.

Leave a comment