बामणडोह, तळेगाव दाभाडे

By Bhampak Places 4 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

बामणडोह, तळेगाव दाभाडे –

शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर घुमटाच्या विहिरीसारखीच सुंदर आहे. संपूर्ण दगडातच बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या आहेत. साधारण मध्यभागी आलो की आतमध्ये फिरण्यासाठी गवाक्षांचा अर्धवर्तुळाकार मार्ग दिसतो आणि पाहणारा चकित होतो. बाहेर आलो की विहिरीवर असलेल्या मोटेच्या धक्क्य़ापाशी जावे. पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळतात.

भौगोलिक स्थान (Location) –

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

साधारण शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर संपूर्ण दगडातच बांधलेली दिसते. पूर्वेकडून या विहिरीत खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आपल्याला विहिरीच्या अंतरंगात घेऊन जातात. साधारण मध्यभागी गेलो की, मग आश्चर्याचा आणखी एक धक्का आपल्याला बसतो. तो म्हणजे या विहिरीभोवती आतमध्ये फिरण्यासाठी गावाक्षांचा सुंदर अर्धवर्तुळाकार मार्ग म्हणजे हॅटस ऑफ! दगडात घडवलेल्या पाच कमानींचा असलेल्या हा मार्ग विहिरींच अंतरंग सुरेख उलगडून दाखवतो .येथे बराच वेळ रेंगाळल तरी मन भरत नाही. करण अशी सुंदर कलाकृतीने घडवलेली विहीर बघायची सवय आपल्याला नसते आणि येथे तर स्थापत्याचाही अविष्कार जोडलेला आहे.

विहिरीतुंन बाहेर आलो की मग वरच्या बाजूस मोटेच्या धक्क्यापाशी यायचे. विहिरीतले पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विहिरीकाठी आढळतात. शेतीसाठी लागणारे पाणीसुद्धा या मोटेतून पुरवले जाई. हे सारे बारीक-सारीक तपशील पाहिले पाहिजे तरच अशा वास्तू बघण्यात मजा आहे. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच विहीरीच सौंदर्य अनुभवण्यात जास्त आनंद आहे.

अशी ही विहीर! भलेही आजच्या युगात हिचे व्यवहारमुल्य शून्य असेल. पण इतिहासाच्या चष्म्याने पाहिलं तर हा वैभवशाली वारसा आहे. ही वास्तू म्हणजे केवळ पाणी साठविण्याचे साधन नसून ती एक परिपूर्ण जलवास्तूच आहे यात शंका नाही. एखाद्या निवांतक्षणी या जलवास्तूत यायचे अन कमानीदार गवाक्षांमधून विहिरीचं गहिर पाणी पाहत राहायचं…. एकदा तरी हा अनुभव घ्यायला तळेगावी याच.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण तळेगाव दाभाडेला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

पुर्वी विशिष्ट समुदायांना सरदारांकडून अथवा राजांकडून विहिरी बांधून दिल्या जात असत. अशीच एक विहीर तळेगावात बांधून दिली गेली. ब्राम्हण समुदायाला अथवा वस्तीला बांधून दिलेल्या या विहिरीला बामणडोह असे नाव पडले, असे अनेक इतिहास अभ्यासक सांगतात. तर अशा विहिरी या राजस्त्रियांच्या स्नानासाठी बांधल्या जात असत असही काही अभ्यासकांच मत आहे. कारण काहीही असो, पण अशा विहिरी असतात मात्र सुरेख !

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –

बामण डोह
घुमटी विहिर
पाचपांडव मंदिर
दाभाडे सरकार वाडा
इंदुरी गढी / किल्ला

माहिती साभार – ओंकार वर्तले.
माहिती संकलन – सायली निंबाळकर.
@Marathi Explorer

Leave a comment