बनेश्वर मंदिर, नसरापूर

By Bhampak Places Articles 5 Min Read
बनेश्वर मंदिर, नसरापूर

बनेश्वर मंदिर, नसरापूर –

नानासाहेब पेशवे यांनी “शिवगंगा” नदीच्या तिरावर इसवीसन १७४९ मध्ये हे बनेश्वर मंदिर बांधून घेतले. त्यासाठी पेशव्यांना त्याकाळी ११,४२६ रूपये ८ आणे ६ पैशे इतका खर्च आला. बनेश्वर मंदिराचा सोपा तीन खणांचा असून त्यावर चोकोनी शिखर आहे. या सोप्यांच्या स्थंबावर कमळ पत्रांची नक्षी कोरलेली आहे. सोप्यातील मधल्य खणाच्या छताला एक मोठ्या आकाराची घंटा लटकावलेली आहे. ही घंटा काशाची असून पोर्तुगीज बनावटीची आहे. ही काशाची घंटा वसई मोहिमेचे विजय चिन्ह आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचं बंधू चिमाजी आप्पा यांनी इसवीसन १७३७ ते १७३९ या कालावधीत उत्तर कोकणातल्या वसई येथील पोर्तुगीजांचा पराभव करुन तेथील अनेक चर्च मधून अशा प्रकारच्या अनेक घंटा विजयाचे चिन्ह म्हणून अनेक मंदिरात या घंटा दिलेल्या आढळत. या घंटेवर इसवीसन १६८३ सालचा आकडा व क्राँसचे चिन्ह पाहण्यास मिळते.

भौगोलिक स्थान (Location) –

पुण्याच्या दक्षिणेस सुमारे ३० कि. मी. अंतरावर, शिवगंगेच्या काठावर, गर्द झाडीत, निसर्गरम्य वातावरणात हे सुंदर बनेश्वर मंदिर पेशव्यांनी बांधलेले आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

मुख्य बनेश्वर मंदिर चारही बाजूंनी बंदिस्त आवारात बांधलेले आहे. या मंदिराच्या अग्नेय बाजूस एक दरवाजा आहे. या दरवाजातून पाय-या उतरून खाली उतरून आत आल्यावर उजव्या बाजूला पाण्याची दोन कुंडे पाहण्यास मिळतात. त्यापैकी उत्तरेकडील कुंडाच्या पश्चिमेला नंदी मंडपात भव्य नंदी पाहण्यास मिळतो. आणि या नंदी मंडपासमोरच मुख्य बनेश्वर मंदिर आहे. या पुर्वाभिमुख शिवालयाच्या तीन, चार प य-या वर चढून आल्यावर या मंदिराचा सोपा लागतो.  सोपा, सभामंडप, व गर्भगृह असे या मंदिराचे तीन भाग आहेत.

मंदिराचा सोपा ओलांडून पुढे आल्यावर सभामंडप लागतो. या सभामंडपाला एकही खांब नसून हा सभामंडप चार बाजूंच्या चार भिंतीवर आधारलेला असून घुमटाने अच्छादलेला आहे. या मंदिराच्या बांधकामातले वैशिष्ट्य जाणकारांना व आपल्याला अचंबित करते.

गर्भगृह –

सभामंडपातून गर्भगृहाच्या पाय-या उतरून खाली आल्यावर आपल्याला प्रथम श्री विष्णू व श्री लक्ष्मी यांच्या मूर्त्या पाहण्यास मिळतात. या मूर्त्यांच्या समोरच उत्तराभिमुखी शिवलिंग आहे. मुख्य म्हणजे हे शिवलिंग एक प्रतिकात्मक असून खरं तर ते एक झाकण आहे. आणि य झाकणाखाली पोकळी आहे. आणि या पोकळीत एक गोलाकार शिला स्थंबावर पाच शिवलिंगे कोरलेली पाहण्यास मिळतात. या शिवस्थंबांचा व्यास सुमारे सहा इंच इतका आहे. वास्तविक हेच येथील ल खरं शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगावर सतत पाणी वाहात असतं. पण गर्भगृहात खुपच अंधार असल्यामुळे हे शिवलिंग आपल्याला नीट दिसत नाही.

बेलाच्या किंवा मोठ्या आकाराच्या पानावर कापूर लावून ते पान पोकळीतील पाण्यावर सावकाश सोडले तर हे शिवलिंग स्पष्ट पणे दिसते. हे पाणी या शिलास्थंबाच्या बाजूने सतत वाहात असते.  बनेश्वर मंदिरातील पाण्याचा चक्रव्यूह हा प्रकार अद्भुत असून अत्यंत मनोवेधक आहे.  सर्वप्रथम सर्व झ-यांचं पाणी एकत्र करून यातील पाणी एका कोनाड्यावाटे एका हौदात जमा होते. या हौदाच्या शेजारी सुमारे १५ फुट औरस चौरस चिरेबंदी कुंड आहे. हा लहान हौद भरला की ते पाणी गोमुखावाटे एका चौरसाक्रुती कुंडात वरुन पडत असतं. आणि या कुंडाच्या शेजारीच याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे असे एक दुसरे कुंड आहे. यापैकी पहिल्या कुंडातील पाणी धार्मिक देवधर्मासाठी व पिण्यासाठी वापरतात. तर दुसऱ्या कुंडातील पाणी स्नानासाठी वापरले जाते.

ही दोन्ही कुंडे सुमारे १२ ते १५ फूट खोल आहेत. या कुंडामधील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी यात निळसर व जांभळ्या रंगाचे मासे सोडलेले आहेत. या माशांना पूर्वी भोर संस्थानातून हरबरे व शेंगदाणे येते असत. आजही रा दोन्ही कुंडात भरपूर मासे पाहण्यास मिळतात. अशा एकूण चार कुंडातून हे पाणी खेळवलेले आहे. तसेच या मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या समोरच मोकळ्या आवारात सडेपाच फूट उंचीचा भव्य त्रिशूळ उभारलेला आहे.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

बनेश्वर मंदिर, नसरापूर हे पुण्यापासून सुमारे ३० कि. मी. अंतरावर आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण बनेश्वर मंदिर, नसरापूरला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

मंदिर परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

मंदिर परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
1 Comment