बनेश्वर मंदिर, तळेगाव दाभाडे –
बनेश्वर नावाची पुणे जिल्ह्य़ात दोन शिव मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे खुप नावाजलेले व सर्वांना परिचयाचे म्हणजे पुण्याजवळील नसरापुर येथील बनेश्वर मंदिर. इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. परंतु पर्यटकांपासुन वंचित राहिलेले एक मंदिर म्हणजे तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर मंदिर. हे खुप प्रचिन मंदिर असून त्याची सुंदरता आज पण टिकून पण पर्यटकांपासुन वंचित आहे.
भौगोलिक स्थान (Location) –
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
मंदिराचा आजुबाजुचा परिसर हा शेती तसेच मनुष्य वस्तीचा असला तरी मनाला शांती व नवचैतन्य देणारा आहे. मंदिराजवळ प्रवेश करताना पहिल्या अनेक समाधी (वीरगळ) दिसतात तर उजव्या बाजुला भारतातील पहिल्या महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांची समाधी दिसते.
गेट मधुन आत प्रवेश करताच समोर नंदीमंडप दिसतो. चार खांबावर उभा असलेला नंदी खुप सुरेख असून लक्ष वेधुन घेईल अशीच त्याची घडण आहे. तसेच याच नंदिमंडपा शेजारी लागुन छोटे बांधीव तळे म्हणा अथवा पुष्करणी आहे. त्याची रचना सुद्धा खुप छान बांधीव दगडानी घडवलेली आहे. या पुष्करणीत उतण्यासाठी चारही बाजुनी पायर्यांची निर्मिती केलेली आहे. याच पुष्करणीला पाणी उपसाण्यासाठी मोटेची बांधणी केलेली आढळते. त्यातील पाण्याचा वापर पुर्वी शेतीसाठी तसेच पिण्यासाठी केला जात असावा. पण आताच्या काळात हे पाणी वापरण्याजोगे किवा पिण्याजोगे नसल्याने या पुष्करणीला नासके तळे असे देखिल नाव मिळाले.
बनेश्वर मंदिराची रचना ही १६ खांबावर केलेली आहे. संपुर्ण दगडात उभारलेली मंदिराची रचना व त्यावर केलेले रंग काम तुम्हाला मोहात पाडायला मजबुर करते. यातील कोणत्याच खांबावर नक्षी काम नाही पण त्याची रचना बघण्या सारखी आहे. छोट्या प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डाव्याबाजुला कोनाड्यात देवीची व उजव्या बाजुच्या कोनाड्यात श्री गणेशाची मुर्ती दिसते. तर मंदाराच्या सभामंडपात एक नगारा देखिल आहे.
हे सगळे बघुन जेव्हा आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा नवचैतन्याची अनुभती येते .मग या धीरगंभीर वातावरणात आपण कधी हरवुन जातो ते कळतच नाही. ह्या सगळ्यातुन बाहेर पडावे असे वाटतच नाही .प्रत्येकाने एकदा तरी ही अनुभवाची शिदोरी अनुभवा असेच हे मंदिर आहे.
याच मंदिराला लागुन सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांची समाधी आहे. ती सुध्दा पाहण्यासारखी आहे.
कधी तरी वेळ काढुन या ठिकाणी भेट द्यावी असेच हे ठिकाण एक नवचैतन्याची अनुभुती तर एका बाजुला पराक्रमाची उम्मीद देणार्या वीराची समाधी.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण तळेगाव दाभाडेला जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
इतिहास (History) –
बनेश्वर मंदिर खुप प्रचिन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम शुर पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळातले आहे. शिव शंभोचे भक्त असल्यामुळे त्यांनी बर्याच ठिकाणी शिव शंकराची मंदिरे उभारली आहेत. त्यातीलच हे एक मंदिर.
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
बामण डोह
घुमटी विहिर
पाचपांडव मंदिर
दाभाडे सरकार वाडा
इंदुरी गढी / किल्ला
माहिती साभार – नितीन केमसे.
माहिती संकलन – सायली निंबाळकर.
@Marathi Explorer