भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी

By Bhampak Places 2 Min Read
रामेश्वर कुंड आणि रामनदी | भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी

भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी –

मुळशी तालुक्यातील प्रवेशद्वार अशी भूगाव व भुकुम या गावांची ओळख आहे.  भुगाव पिरंगुट यांच्या मध्ये असलेल्या  भुकुम गावाच्या शेवटी हनुमानाचे मंदिर आहे.  खालून गावा शेजारून, एक सुंदर ओढा वाहतो. याच ओढ्याच्या शेजारी शिवलिंगाच्या आकाराची पुष्करणी आपल्याला दिसते. साधारण .१८फूट रुंद तर ३२फूट लांब असलेली ही पुष्करणी मुळशी तालुक्यातील एकमेव भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी आहे.

भौगोलिक स्थान (Location) –

भुकूम ,भुगाव आणि दोन्ही बावधन ही गावे पुण्याच्या पश्चिम दिशेला पुणे कोलाड हायवेवर एका सरळ रेषेत बसलेली आहेत. पुण्यापासून ४० कि.मी. वर भूकुम गाव आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

भुकुम गावातील पुष्करणी  मध्ये  जायला 11 पायऱ्या असून आता मध्ये एका देवळी आहे या मध्ये माऊलाई देवीचा तांदळा आहे. पुष्करणीच्या  मध्ये एक गोमुख सुद्धा असून, या पुष्करणी कडे पाहून ती साधारण २५० ते३००वर्ष  जुनी असेल असा आंदाज येतो मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई अहील्यादेवी होळकर यांनी अनेक मंदीरे व पुष्करणी बांधल्या ही देखील त्यांच्याच काळातील पुष्करणी आहे . याबद्दल अजुन काही ऐतिहासिक माहिती मिळाली नाही आपणास ठाऊक असल्यास नक्की कळवावे .

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

भूकुम हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण भूकुमला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
Leave a comment