काले घोडे के नाल कि अंगुठी
काल आठवडी बाजार मध्ये गेलो होतो सहज,सगळे लोकं आपल्या आपल्या कामात व्यस्त होते कोणी भाजी विकत कोणी जागेवरून भांडण करत.सगळे जन आपल्या पोटापाण्यासाठी भर उन्हात बसून होते.त्या सगळ्यांना बघत असताना मध्येचं एक गाड्यावरचा आवाज कानी पडत होता,मी तो गाडा शोधत गेलो तिथे गेल्यास पाहिलं एक छोटा गाडा त्यावर एक स्पीकर आणि टेप लावलेला आणि तिथे एक व्यक्ती होता त्या गाड्या वर वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या,हातातले कडे असं सामान होत ते तो विकत होता.मी त्याला दुरून बघत होतो तो आपल्या कामात व्यस्त होता.
तिथे ठेवलेल्या अंगठ्या काय सध्या सुध्या नसून नशीब बदलणाऱ्या आहेत असं तो सांगत होता आणि ते मी ऐकलं.म्हणलं चला आता तर बघायलाच लागेल नक्की काय भानगड आहे म्हणून मी त्या गाड्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं या अंगठीने काय होत बरं ?त्यावर तो छान सांगत होता.त्याच म्हणणं होत प्रत्तेक माणसावर शनी चा प्रकोप झाला आहे म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करून ऋषीमुनींनी या सगळ्या समस्यांवर उपाय शोधला आहे ”काले घोडे के नाल कि अंगुठी”
काले घोडे के नाल कि अंगुठी
काळ्या घोड्याची नाळ असते ना त्यापासून हि अंगठी बनवलेली आहे.तुमच्या घरात भांडण होत असतील,व्यापारात मन नसेल लागत नुकसान होत असेल,व्यापार चालत नसेल ग्राहक येत नसतील,अभ्यासात मन नसेल लागत,जादूटोना,खूप शिकून बेरोजगार असलेले,नवरा बायको ची भांडणं,घरात किरीकीरी या सगळ्यांवर एकच उपाय तो म्हणजे ”काले घोडे के नाल कि अंगुठी” फक्त १० रु.असं तो सांगत होता.काळा घोडा हा सहजासहजी मिळत नाही खूप मेहनत करावी लागते तेंव्हा हा घोडा मिळतो.हे त्याने त्याच्या टेप मध्ये सुद्धा रेकॉर्ड करून ठेवलेलं होत आणि ते चालू होतं.१० रुपयाच्या अंगठीने येवढ काही होऊ शकतं हे मला पहिल्यांदाच कळालं.तिथे लोकं सुद्दा येत होते ती अंगठी घेण्यासाठी गर्दी करत होते प्रत्तेकाला त्या अंगठीवर विश्वास होता असं दिसत होतं.
प्रत्तेकाच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे ती अंगठी आहे असं म्हणून तिथले लोकं घेत होते वाटतं.खरचं ते बघून वाईट वाटलं लोकं स्वतः काही न करता अश्या अंगठ्या च्या नादाला लागतात त्यांना वाटते याने आपल्या समस्या दूर होतील.असो त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे तो आपल्याला काय.
काले घोडे के नाल कि अंगुठी
१० रुपयाच्या अंगठीने नशीब बदललं असतं तर या जगात कोणी काही केलचं नसतं काही झालं कि घातलीच अंगठी काय तर म्हने नशीब बदलेल प्रश्न सुटतील विनोदास्पद वाटतं हे सगळ असो बर खरचं जर याने तुमच्या व्यापारात प्रगती होत असेल किंवा तुमचा व्यापार मोठा होत असेल किंवा तुम्ही श्रीमंत होत असाल तर मग तो गाड्यावाला जो आहे तो ती अंगठी विकत आहे त्याचं तर जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत नाव यायला पाहिजे होतं तसं का बर नाही झालं ? बेरोजगारांना जर नोकरी मिळत असेल तर भारतात एवढे बेरोजगार राहिलेच नसते.किंवा हि अंगठी घालून त्याने नोकरी का बर नसेल केली नसेल बरं ? देवाने त्याला लोकांच भलं करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं असेल का बरं ? असू हि शकतं कारण १० रुपयाच्या अंगठीने स्वतः चं भलं न करता लोकांच करायचं हे मात्र चांगलं काम तो करत होता.
तो या अंगठ्या विकतो यावर मला काहीच त्रास नाही शेवटी त्याला हि माहित आहे कि याने काही होत नाही आणि मला देखील माहित आहे.सगळ काही पोटासाठी करायला लागतं आणि ते तो मनापासून करत होता.ते म्हणतात न ”दुनिया झुकती ही झुकाणे वाला चाहिये” तो हेच करत होता बघून आवडलं सगळ ते त्यात एक महत्वाच सांगायचं विसरूनच गेलो त्या अंगठ्यापैकी एकही अंगठी त्याच्या बोटात नव्हती.का नव्हती ते त्यालाच माहित असो. या सगळ्यावरून एक कळतं पोटासाठी कधी कधी खोटंही बोलावं लागतं.