ब्रेड रसमलाई | Bread Rasmalai

By Snehal's Kitchen Corner Recipe 1 Min Read

ब्रेड रसमलाई | Bread Rasmalai

साहित्य:
२ ब्रेड स्लाइसेस, ७५० मिली दूध, ४ चमचे साखर, २ चमचे दूध पावडर, २ चमचे केशर दूध, २चमचे सुकामेवा

कृती:
१. प्रथम कढईमध्ये दूध घेऊन ते अर्धे होईपर्यंत आटवून घ्यावे.

२. आटवून झाल्यावर त्यात साखर, दूध पावडर, केशर दूध, सुकामेवा टाकून एक उकळी आणून घ्या. नंतर हे दूध गार करून घ्या.

३. नंतर ब्रेडच्या तुकड्यांवर हे दूध हळूहळू ओतून घ्या. दूध सर्व तुकड्यांना लागेल हे बघा.

४. वरुन सुकामेवा टाका आणि फ्रिजमध्ये १ ते २ तास गार करून घ्या आणि बाउलमध्ये सर्व करा.

अशाप्रकारे आपली ब्रेड रसमलाई तयार!

Please check above recipe video and subscribe my channel for more recipes

Leave a Comment