चार धाम यात्रा

By Bhampak Travel 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

चार धाम यात्रा-

हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चार धाम म्हटलेले आहे व चार धामांची यात्रा सांगितली आहे. ते चार धाम खालीलप्रमाणे-

बद्रीनाथ (उत्तराखंड) –

बद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून व ते राजधानी डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस स्थित आहे. आद्य शंकराचार्यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

केदारनाथ (उत्तराखंड) –

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम[१] ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात.

गंगोत्री (उत्तराखंड) –

गंगोत्री हे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातले गाव आहे. गंगा नदीचे उगमस्थान असलेले हे ठिकाण हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र मानले जाते. हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेले गंगोत्री ३,४१५ मी. उंचीवर वसले आहे.

यमुनोत्री (उत्तराखंड) –

यमुनोत्री हे उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील ३,२९३ मीटर (१०,८०४ फूट) उंचीवरील ठिकाण यमुना नदीचे उगमस्थान आहे. यमुनोत्री उत्तरकाशीच्या ३० किमी उत्तरेस स्थित असून ते केदारनाथ, बद्रीनाथ व गंगोत्रीसह छोट्या चार धाम यात्रेमधील एक स्थान मानले जाते.

वैष्णव तीर्थे –

आदिगुरू शंकराचार्य यांनी परिभाषित केल्याप्रमाणे तेथे चार वैष्णव तीर्थे आहेत. जिथे प्रत्येक हिंदूला त्याच्या आयुष्यात जाणे आवश्यक आहे, जे हिंदूंना मोक्ष प्राप्त करण्यास मदत करेल. याच्या उत्तरेस बद्रीनाथ, पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथ पुरी व दक्षिणेस रामेश्वरम् धाम आहे.

आदि शंकराचार्यांचे चार मठ भारताच्या चार कोपऱ्यात आहेत. ते असे :-

पश्चिम दिशेला शारदा मठ, द्वारका (गुजरात) … स्थापना युधिष्ठिर संवत् २६४८
दक्षिणेला शृंगेरी (चिकमंगलूर), रामेश्वर (वेदान्त मठ तामिळनाडू) … स्थापना-युधिष्ठिर संवत् २६४८
पूर्वेला जगन्नाथपुरी (गोवर्धन मठ, ओरिसा)… स्थापना युधिष्ठिर संवत् २६६५
उत्तरेला ज्योतिर्पीठ, (बद्रीनाथ (उत्तराखंड) … स्थापना-युधिष्ठिर संवत् २६४१ ते २६४५

Leave a comment