चिजी बाईट्स
साहित्य:
२ चमचे मैदा, 1 वाटी गव्हाचे पीठ, चीज पावडर, तिखट, सैंधव, मीठ,पाणी, तेल
कृती:
१. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, २ छोटे चमचे तेल आणि पाणी घालून कणिक भीजवून घ्यावी.
२. नंतर अर्धा तास ती कणिक झाकून ठेवावी.
३. कणकेचे छोटे गोळे करून त्याची पोळी लाटून घ्यावी आणि हव्या तश्या आकारामध्ये काप करावेत.
४. कढईमध्ये तेल गरम करून हे काप टाळून घ्यावेत. टाळून झाल्यावर त्यावर चीज पावडर, तिखट आणि सैंधव घालावे.
अश्याप्रकारे आपले चिजी बाईट्स तयार!