चिकन बारबेक्यू
साहित्य:
अर्धा किलो बोनलेस चिकन, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, पाव किलो दही, आलं-लसूण पेस्ट, ४ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, तेल
कृती:
१. प्रथम चिकन धुवून स्वच्छ करून घ्यावे.
२. कांदा, सिमला मिरची, टोमॅटोचे मोठे काप करून घ्यावेत.
३. एक बाउल मध्ये बोनलेस चिकन, भाज्यांचे काप घासून त्यात लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, दही, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करून घ्यावे आणि अर्धा तास मॅरीनेट साठी ठेऊन द्यावे.
४. बारबेक्यू स्टिकला मॅरीनेट केलेले चिकन आणि भाज्यांचे काप एकामागे एक लावून घ्यावे आणि कोळशावर किंवा तव्यावर भाजून घ्यावे. भाजताना मंद आचेवर थोडे तेल लावून भाजावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपले बारबेक्यू चिकन तयार!