चिकन कॅफ्रेअल
साहित्य:
चिकन २५० ग्रॅम, १ मोठी वाटी कोथिंबीर, ६-७ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, ३-४ हिरव्या मिरच्या, ३-४ लवंग, ३-४ कली मिरी, २ दालचिनी चे छोटे तुकडे, अर्धा चमचा जिरे, मीठ, तेल
कृती:
१. प्रथम चिकन साफ करून त्यातील पाणी काढून घ्यावे आणि थोडे कोरडे करून घ्यावे.
२. मिक्सरमध्ये कोथिंबीर, आले, लसूण, हिरवी मिरची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, जिरे आणि मीठ घालुन बारीक वाटून घ्यावे.
३. एका भांड्यात चिकन घेऊन त्यात तयार केलेली हिरवी पेस्ट टाकून ३० मिनिटे मॅरीनेट करून घ्यावे.
४. नंतर एका कढईमध्ये ४-५ चमचे तेल टाकून त्यात मॅरीनेट केलेले चिकन (आणि राहिलेली हिरवी पेस्ट सुद्धा) मंद आचेवर साधारण १०-१५ मिनिटे व्यवस्थित शिवजून घ्यावे.
५. नंतर एका प्लेटमध्ये हे चिकन गरमागरम सर्व्ह करावे.
अश्याप्रकरे आपले चिकन कॅफ्रेअल तयार!
– स्नेहल काळभोर
https://www.instagram.com/s_n_e_h_a_l_k?r=nametag