चिकन तंदूर

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 1 Min Read
chiken-tandur

चिकन तंदूर

साहित्य:

१ किलो चिकन, ५०० ग्राम दही, ५ चमचे चिकन मसाला, ३चमचे लाल तिखट, २ चमचे मीठ, २ चमचे आलं-लसूण पेस्ट, २ चमचे तेल, अर्धा चमचा खाण्याचा लाल रंग

कृती:
१. प्रथम १ किलो चिकन चांगले धुवून घ्यावे. त्यात दही, चिकन मसाला, लाल तिखट, मीठ, आलं-लसूण पेस्ट आणि तेल घालून १ तास marinet करून घ्यावे. एक तासानंतर त्यात खाण्याचा लाल रंग टाकावा आणि चांगले एकत्र करून घ्यावे.

२. नंतर कोळशाची शेगडी/ तंदूरपात्र/ gas वर तवा चांगला गरम करून घ्यावा.

३. त्यावर marinet केलेले चिकनचे पीस ठेवावेत. मध्ये-मध्ये थोड तेल घालून चांगले भाजून घ्यावेत. दोन्ही बाजूने चांगले भाजून झाले की गरमागरम सर्व्ह करावे.

अशाप्रकारे आपले चिकन तंदूर तयार!

वेळ: २ तास

टीप: आपल्या आवडीनुसार आपण कमी-जास्ती लाल तिखट आणि चिकन मसाला घालू शकतो.

1 Comment