चुरमुरा/मुरमुरा वडी
साहित्य:
4 वाटी चुरमुरे, १ वाटी गूळ, एक छोटा चमचा वेलची पूड, काजू-बदाम काप, साजूक तूप
कृती:
१. प्रथम चुरमुरे कढईत घेऊन नीट भाजून घ्या. थोडे कुरकुरीत झाले की थोडे गार होऊ देणे.
२. नंतर थोडेसे काजू-बदाम साजूक तुपावर हलकेसे खरपूस भाजून घेणे.
३. एकीकडे कढईमध्ये गूळ घेऊन तो वितळवून घ्यावा. नंतर त्यात चुरमुरे टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. त्यातच सुवासासाठी थोडी वेलची पूड घालावी.
४. एक डिशला थोडे साजूक तूप लावून घेणे. हे मिश्रण गार होण्याआधी डिशमध्ये काढून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. वरतून काजू-बदाम काप लावावेत आणि गार होण्यासाठी ठेऊन द्याव्यात.
५. अश्याप्रकारे कुरकुरीत चुरमुरे वडी खाण्यासाठी तयार.
वेळ: एक तास
टीप:
गुळाऐवजी साखरेचा ही वापर करता येईल .
वडीऐवजी मिश्रण गरम असताना त्याचे लाडू ही करता येतात.