दावणगिरी लोणी डोसा
Ingredient:
- २ वाटी तांदूळ
- १ वाटी पोहे
- अर्धी वाटी उदीड डाळ
- १ छोटा चमचा मेथ्या दाणे
- १ चमचा खायचा सोडा
- मीठ चवीनुसार
- लोणी
Recipe Instruction:
१. प्रथम एका भांड्यामध्ये तांदूळ, पोहे, उडीद डाळ, मेथ्यादाणे घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि ३ ते ४ तास पाण्यात भिजवत ठेवावेत.
२. ३ ते ४ तास भिजल्यावर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. आणि तयार झालेले पीठ साधारण ९-१० तास आंबवून घ्यावे.
३. पीठ चांगले आंबले की त्यात खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून त्याचे गोल, थोडे जाड आणि छोटे डोसे करून घ्यावेत.
वरून लोणी टाकून भाजून घ्यावे आणि प्लेटमध्ये चटणी किंवा बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपले दावनगिरी लोणी डोसा तयार!