डबल लेयर्ड मँगो लस्सी

By Snehal's Kitchen Corner Recipe Food Video 1 Min Read

डबल लेयर्ड मँगो लस्सी

साहित्य:
२ वाटी दही, १ वाटी आमरस किंवा मँगो पल्प, ६ चमचे साखर, चिमूठभर वेलचीपूड, बर्फ- हवा असल्यास

कृती:
१. प्रथम एका भांड्यात दही घेऊन त्यात बर्फ आणि साखर घालावी आणि थोडं ब्लेंड करून घ्यावे. ही झाली आपली लस्सी तयार!

२. वरील थोडे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात घ्यावे आणि त्यात आमरस आणि वेलचीपूड घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

३. एका सर्व्हिंग ग्लासमध्ये खाली आपण केलेली साधी लस्सी घालावी आणि वरून आंब्याची लस्सी घालावी. म्हणजे २ वेगळे ठार दिसतील. आणि गार असताना सर्व्ह करावी.
अशाप्रकारे आपली डबल लेयर्ड लस्सी तयार!

-Snehal Kalbhor

Leave a comment