Egg Maggie | एग मॅगी
साहित्य:
१ मॅगी पॅकेट, १अंड, कांदा, टोमॅटो, पाणी, तेल, लाल तिखट
कृती:
१. प्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत.
२. एका कढईत तेल घेऊन त्यात कांदा-टोमॅटो परतून घ्यावा. त्यात लाल तिखट घालून त्यात अंड फोडून घालावं. आणि चांगले एकत्र करून २ मिनिट्स परतून घ्यावेत.
३. त्यात एक कप पाणी घालावे आणि पाणी उकळत आल्यावर त्यात मॅगी मसाला घालावा. तसेच नंतर मॅगी घालून शिजवून घ्यावी आणि पाणी पूर्ण आटवून घ्यावे.
गरमागरम एग मॅगी बाउलमध्ये सर्व्ह करावी.
अश्याप्रकारे आपली एग मॅगी तयार!