अपेक्षा | Expectation
माझी एक मैत्रीण, अगदी लहानपणापासूनची. आमची मैत्री पण एकदम छान. तर त्या मैत्रीणीच्या लग्नाचं बघायचं चालू होतं. मी तीचा एकदम जवळचा मित्र, त्यामुळे ती मला सगळं सांगायची. तिच्यासाठी जी स्थळं यायची त्यांच्याबद्दल ती माझ्यासोबत चर्चा करायची.
मुलांचे फोटो आणि नाव मला व्हाॅटस्अप ला पाठवायची आणि मग आम्ही त्यावर चर्चा करायचो.. एखादा चांगला वाटला की मग त्याला फेसबुकवर शोधून त्याची प्रोफाईल चेक करायचो.. मग त्यावरून तो मुलगा कसा असेल याचे तर्क लावायचो.. एकंदरीत तीच्या मुले पाहण्याच्या कामात मी जमेल तेवढी मदत करायचो.
तीचा माझ्यावर विश्वास होता त्यामुळे ती पण माझं ऐकायची.. असचं बर्याच स्थळांना नाकारून झालं होतं.. एक दिवस तिचा मेसेज आला..
ती : काय करतोय?
मी : as usual.. निवांत बसलोय.
ती : एक स्थळ आलयं.
मी : काय करतो मुलगा?
ती : पुण्यात एका मोठ्या कंपनीत जाॅब करतो.
मी : दिसायला कसा आहे?
ती : छान आहे. तुला फोटो पाठवते आणि नाव पण. फेसबुकवर बघ बरं.
मी : पाठव.
तीने नेहमीप्रमाणे फोटो पाठवले आणि नाव पण.. मग मी फेसबुकवर त्याला शोधलं.. चांगला वाटला मुलगा. त्याची प्रोफाईल चेक करून मग मी तीला मेसेज केला.
मी : चांगला आहे की मुलगा.
ती : हो चांगला आहे.. शिक्षण चांगलं झालय, छान जाॅब आहे, दिसायला पण छान आहे, मी स्वतः बोलले त्याच्याशी तर स्वभावाने पण चांगला वाटला.
मी : मग?
ती : म्हणजे एवढा जास्त काही कळला नाही स्वभाव, पण जेवढं बोलणं झालं त्यावरून तरी चांगला वाटला.
मी : मग अजून थोडं गप्पा मारा.. वेगवेगळ्या विषयांवर बोला म्हणजे स्वभाव समजायला मदत होईल.
ती : हो.. फेसबुकवर बोलते मी त्याच्याशी.
मी : घरातल्यांना पसंत आहे का?
ती : हो.. पण जरा कन्फ्युज्ड आहेत सगळेच म्हणून मी वेळ मागून घेतलाय.
मी : काय झालं?
ती : घरी मुलगा पसंत आहे पण मुलाच्या घरची परिस्थिती ठिकठाक आहे, फार काहि चांगली नाहिये म्हणून घरी कन्फ्युज आहेत.
मी : पण मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे?
ती : हो.. पण घरातल्यांच कसं असतं माहित आहे ना? घर पाहिजे, जमीन पाहिजे.
मी : घर नाहिये का?
ती : आहे पण साधं आहे, गावाकडे.
मी : तुझी काय अपेक्षा आहे?
ती : माझी काही नाही. मुलगा चांगला पाहिजे. बस.
मी : मग तु घरी काय सांगितलं?
ती : मी वेळ मागून घेतलाय. तुला काय वाटतं? काय करावं?
मी : मला असं वाटतंय की मुलगा पसंत असेल तर होकार द्यायला हरकत नाहि. कारण तो आणि तु दोघं पण पुण्यात जाॅब करणार, दोघांच्या पगारातून तुम्ही चांगली लाईफ जगू शकता.. शेती तर काय तुम्ही करणार नाही.. त्यामुळे त्याच्याकडे जमीन असावी अशी अपेक्षा ठेवायला नको.
ती : शेतीबद्दल एवढं काही नाही पण घर असायला पाहिजे असं म्हणतात घरातले.
मी : तुम्ही दोघे कमावते असल्यावर आज ना उद्या स्वतःच घर घेऊ शकता की.
ती : हो.
मी : हे बघ, मुलगा कर्तृत्ववान असायला पाहिजे.. आज काही नसेल त्याच्याकडे तरी ठिक आहे पण काहितरी करून दाखवेल असा मुलगा पाहिजे.
ती : हो. बरोबर आहे.
मी : आतापर्यंत कितीतरी मुले बघितली, कोणी कमी शिकलेलं तर कोणी पसंत पडत नव्हतं तर कोणाची पत्रिका जुळत नव्हती. या मुलाबद्दल तसं काही नाहिये.. सगळ्या बाजूने पसंत आहे तुला पण आणि घरातल्यांना पण.
ती : हो. आहे चांगला.
मी : मग फक्त घर नाहि यावरून तु नकार देऊ नकोस. घरी समजून सांग की मुलगा चांगला आहे आणि आज ना उद्या स्वतःचं घर घेऊ शकेल असा जाॅब आहे तर हरकत नसावी.
ती : हममम चालतय.
मी : तुला मनापासून आवडलाय ना?
ती : हो.
मी : मग आता असं कर, तु त्याच्यासोबत अजून गप्पा मार, म्हणजे त्याबद्दल मत बनवायला बरं होईल. तुला त्याचा स्वभाव बर्यापैकी कळला की मग घरी होकार कळव.
ती : हो तसचं करते. घरात समजून सांगावं लागेल.
मी : त्या कारणासाठी नकार देणे ठिक नाहि वाटत. बापाच्या जीवावर उड्या मारणारा मुलगा नको म्हणाव मला.. ऐकतील घरातले.
ती : तुझ्याशी बोलून थोडं कन्फ्युजन कमी झालं.
मी : मला पण मनापासून असं वाटत की जास्त अपेक्षा ठेवण्यात काहि अर्थ नाहि. शिक्षण, स्वभाव, उत्पन्नाचा मार्ग आणि व्यक्तिमत्व या गोष्टींबद्दल अपेक्षा असाव्यात. पण घर, जमीन, गाडी, मोठ्या पगाराची नोकरी अशा अपेक्षा नसाव्यात.
ती : हो मी बोलते घरी यावर.
मी : चालेल. बाकी?
ती : काही नाही हेच चाललयं लग्नाचं.
मी : मुलगा आणि त्याचा स्वभाव जर आवडला असेल तर दे होकार. मी वाट बघतोय तुझ्या लग्नाचे लाडू खायची.
ती : मिळतील मिळतील..
मी : नंतर बोलू.
ती : हो. बाय.
मी : बाय.
त्या दिवशी माझ्यासोबत बोलल्यावर तिचं कन्फ्यूजन दूर झालं आणि तिने घरी होकार कळवला. लग्न वगैरे झालं आणि आता छान संसार चालू आहे. दोघे पण चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतात. मस्त चाललयं एकदम.
आपल्यापैकी बऱ्याच जणांची लग्न ठरवताना अशीच स्थिती होत असते. आपण समोरच्या कडून अवास्तव अपेक्षा ठेवत असतो.. माझ्या मैत्रिणीने जसा समजूतदारपणा दाखवला तसा प्रत्येकाने दाखवायला हवा.