किल्ले बेळगाव

किल्ले बेळगाव

किल्ले बेळगाव –

कर्नाटक राज्यातील बेळगाव  ह्या मराठी भाषिक शहरात लष्कराचा तळ असलेला भुईकोट आहे. मराठा लाईफ इन्फन्ट्री या शूर बटालियनचा तळ किल्ल्यात आहे त्यामुळे नियमांचे पालन करूनच किल्ल्यात भ्रमंती करावी लागते. किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य आणि मजबूत स्थितीत आहे. किल्ल्याभोवती खंदक आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर लगेचच दुर्गादेवीचे मंदिर आहे. बाकी सर्व प्रशासकीय कार्यालय आहे. किल्ल्याचे  प्रमुख आकर्षण असलेले “कमल बसदी” म्हणजे “रट्ट जिनालय” पहायला मिळते.

किल्ल्याची निर्मिती रट्ट राजाच्या काळात १३ व्या शतकात केली. किल्ल्याने अनेक राजवटी पाहिल्या विजयनगरचे साम्राज्य, आदिलशहा, मराठे आणि इंग्रज यांनी किल्ल्यावर आपले राज्य गाजवले. किल्ल्याची तटबंदी आणि खंदक आदिलशहाचा सरदार याकुबअली खान याने उभारले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी महात्मा गांधीजींना किल्ल्यात कैद करून ठेवले. बेळगावला पूर्वी वेणुग्राम म्हणून ओळखले जात असे.

कमल बसदी हे नाव आतमध्ये असलेल्या दगडी झुंबरावर असणाऱ्या कमळामुळे पडले. या नेमिनाथ तीर्थंकर बसदीची निर्मिती रट्ट राजा चौथा कर्तविर्य यांचे मंत्री बिच्चीराजा यांनी इ.स. १२०४ मध्ये शुभचंद्र भट्टारक देव यांच्या प्रोत्साहनातून केली. कमल बसदीची अधिक माहिती  बालचंद्रदेव यांनी रचलेल्या शिलालेखातून मिळते. हे शिलालेख सध्या लंडनमधील संग्रहालयात आहेत.

टीम – पुढची मोहीम

Leave a comment