किल्ले हुली

किल्ले हुली

किल्ले हुली –

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुली या प्राचीन नगरीत डोंगरावर किल्ला आहे. हुली हे गाव बेळगावापासून साधारण १०० कि.मी अंतरावर आहे आणि सौंदत्तीपासून १२ कि.मी अंतरावर आहे. हुली ही बेळगाव जिल्ह्यातील प्राचीन नगरी आहे. गावात प्रवेश करतानाच डोंगरावर किल्ला आहे हे समजते. छोटी चढण चढून आपण किल्ल्यावर पोचतो. किल्ले हुली किल्ल्याला बुरुज आहे तटबंदी ढासळलेली आहे. सिद्धेश्वराचे मंदिर आहे, गणपतीचे शिल्प आहे. किल्ला छोटासा आहे. गावातील दोन डोंगरामध्ये पाणी अडवून एक तलाव केला आहे त्यानेच हुली गावच्या पाण्याची अडचण भागविली जाते. ही प्राचीन पाणीपुरवठा व्यवस्था आहे.

हुली गाव हे गावात असणाऱ्या मंदिरांमुळे प्रसिध्द आहे. चालुक्य शैलीची, जैन बसदी प्रकारातील मंदिरे आहेत. त्यातील पंचलिंगेश्वर मंदिर हे पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येते. उत्कृष्ट स्थापत्य कलाविष्कार असलेले हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात वीरगळ संवर्धन करून ठेवण्यात आलेल्या आहेत.

हुली हा प्रांत सुरवातीला सौंदत्तीच्या रट्ट राजांकडे होता.राष्ट्रकुट, चालुक्यांची राजवट पण होती. पुढे बहामनी आक्रमणानंतर आदिलशाहीकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी धारवाड प्रांत स्वराज्याला जोडला तेव्हा हुलीही ताब्यात घेतले. पुढे किल्ला करवीरकरांच्या ताब्यात आला. पुढे सदाशिवराव भाऊंनी इ.स. १७४७ मध्ये दक्षिणेत स्वारी केली आणि देसाईंना जरब बसवून ३५ परगणा काबीज केला त्यात हुली होते. माधवराव पेशवेंच्या काळात हुली पटवर्धनांच्या ताब्यात होते. पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेले. गावात अनेक मराठी कुटुंबं आहेत.

टीम – पुढची मोहीम

Leave a comment