किल्ले मडिकेरी –
कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील मडिकेरी या थंड हवेच्या ठिकाणी असलेला हा मडिकेरी भुईकोट किंवा किल्ले कूर्ग. हा भव्य किल्ला कुर्गची ऐतिहासिक खूण आहे. हा किल्ला मडीकेरी शहराच्या मध्यभागी आहे. हेलेरी घराण्याचे मुद्दू राजा यांनी इ.स.१६८१ मध्ये बांधला. हे पहिल्यांदा किल्ला मातीचा बांधला. राजाने किल्ल्याच्या आवारात मातीचा वाडा बांधला होता.
जेव्हा टीपू सुलतानने हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्याने इ.स.१७८६ मध्ये ग्रॅनाइट दगडांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. त्याचे नाव जाफरबाद असे ठेवले. इ.स. १७९० मध्ये, डोड्डा विरा राजेंद्र, प्रसिद्ध हलेरी शासक याने किल्ल्याचा ताबा घेतला. लिंगराजेंद्र वोडेयार दुसरा या राजाच्या कारकिर्दीत इ.स १८१२-१८१४ च्या दरम्यान या किल्ल्यावर आणखी बदल व नूतनीकरण केले.
इ.स १८३४ मध्ये ब्रिटीशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. गडाच्या तटबंदी आणि त्याच्या तटबंदीमध्ये काही बदल केले. या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे की मंदिर, चर्च, एक तुरूंग आणि एक संग्रहालय यांच्या प्रत्येकाच्या बांधणीत फरक आहे. किल्ल्याच्या भिंतींच्या आत चर्च म्हणजे किल्ल्यावरील ब्रिटिश लोकांचे वर्चस्व होय. सेंट मार्क्स चर्चची स्थापना ब्रिटिशांनी इ.स.१८५९मध्ये केली. किल्ल्यातील विरभद्राचे मंदिर काढून चर्चच्या बांधकामासाठी वापर केला. हे गॉथिक शैलीमध्ये खिडक्यासह बांधले गेले.
सध्या किल्ल्यात जेल आणि शासकीय कार्यालय आहे. गणपती मंदिर, महात्मा गांधी वाचनालय आहे.
टीम- पुढची मोहीम