किल्ले सौंदत्ती –
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती या तालुक्याच्या गावी छोट्याश्या टेकडीवर एक मजबूत किल्ला आहे. सौंदत्ती हे गाव बेळगावपासून साधारण ९० कि.मी अंतरावर आहे. रेणुकामाता म्हणजेच यल्लमा देवीचे तीर्थस्थान असलेले हे ठिकाण पण जवळच दोन किल्ले आहेत येडरावीजवळ पारसगड आणि सौंदत्ती गावात सौंदत्ती किल्ला. कोणताही संघर्ष न घडल्यामुळे किल्ला आजही सुस्थितीत आहे.
गावात आल्या आल्या टेकडीवर किल्ला त्याची तटबंदी, बुरूज लक्ष वेधून घेतात. किल्ल्यात भव्य प्रवेशद्वारातून प्रवेश होतो. आत सलग दोन प्रवेशद्वार आहेत. एका द्वारावर कमल पुष्प आहे.आतमध्ये पाण्याची विहीर आहे, बांधकाम आहेत. महादेव सुंदर मंदिर आहे. किल्ल्यातून संपूर्ण सौंदत्ती दिसते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाहीकडून हा प्रांत स्वराज्यात सामील झाला. पुढे इ.स. १७३० मध्ये सावनूरच्या नवाबाने नवलगुंदच्या देसाईंस शिरसिंगी आणि सौंदत्ती गावची देसाईकी दिली. जयाप्पा देसाईंनी इ.स. १७४३ ते १७५१ दरम्यान किल्ल्याची उभारणी केली. पुढे म्हैसूरच्या हैदरअलीने किल्ला ताब्यात घेत देसाईंना त्याच्या अधिपत्याखाली आणले. पुढे इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला
टीम – पुढची मोहीम