किल्ले शिरसंगी –
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी गावात भुईकोट आहे. किल्ले शिरसंगी हा भुईकोट म्हणजे देसाई घराण्याची गढी आहे. शिरसंगी गाव हे बेळगावपासून १०० कि.मी अंतरावर आहे आणि सौंदत्तीपासून २७ कि.मी अंतरावर आहे. ह्या गढीचे प्रवेशद्वार एकदम भक्कम आहे. गढीचे बुरूज, तटबंदी पण सुस्थितीत आहे.
आतमध्ये लाकडी काम केलेला वाडा आहे. काष्ठशिल्प पहायला मिळतात. वाड्यात सुंदर असे छोटेसे शिवालय आहे. वाड्यात देसाई घराण्यातील पूर्वजांची छायचित्रे, वंशावळ लावलेली आहे. एकंदरित गढी एकदम सुस्थितीत आणि वैभवशाली आहे.
इ.स. १७३० मध्ये सावनूरच्या नवाबाने नवलगुंदच्या देसाईंस शिरसंगी आणि सौंदत्ती या गावची देसाईकी दिली. पुढे त्यांचे वंशज त्यागवीर लिंगराज देसाई यांनी ह्या भुईकोटाची म्हणजेच गढीची उभारणी केली. हे देसाई नंतर म्हैसूरच्या हैदरअलीच्या अधिपत्याखाली आले.
टीम – पुढची मोहीम