गारगोटी संग्रहालय

By Team Bhampak Travel 1 Min Read
bhampak post

गारगोटी संग्रहालय (माळेगाव – सिन्नर)

आशिया खंडातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालय कुठे असेल तर ते माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत. श्री. के. सी. पांडे यांनी दोन काटी रुपये खर्च करून त्यानी हे संग्राहलय उभारले आहे. गारगोटयांचा विविध आकारातील, रंगातील संग्रह थक्क करणारा आहे.
श्री. पांडे ह्यांच्या कित्येक वर्षाच्या परिश्रमामुळे संग्रहालयात आपल्याला निसर्गाची ही किमया पहायला मिळते. या संग्रहालयाला सरस्वती पुरस्कार, सिन्नर गौरव पुरस्कार आदींनी गौरवण्यात आले आहे.

 

 

 

 

 

ह्या संग्रहालयात प्रवेश केल्यावर भारतमातेची भव्य व तेजस्वी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. त्याचबरोबर इथे लाइट ग्रीन दगड, पिवळ्या कॅल्साइटचे स्फटिक यांचे प्रदर्शन मांडले आहे.

सोने, हिरा, झिओराईट, कॉव्हानाईट असे अनेक प्रकारच्या नैसर्गिक गारगोटया आपल्याला पहायला मिळतात. यांचा वापर खरं तर जलशुद्धीकरण आणि जड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. प्रत्येक झीओलाइटला स्वतंत्र रंग आणि आकार असतो हे इथे पाहिल्यावर प्रकर्षांने जाणवते.
हे संग्रहालय वर्षभर सकाळी १० ते रात्री १० उघडे असते. याचे प्रवेशमूल्य माणशी रु. १०० एवढे आहे. काही वेळा हे प्रदर्शन प्रेक्षकांकरिता २४ तास खुले असते.

marathiworld.com
marathiworld.com
Leave a comment