घोरावडेश्वरचा डोंगर –
भौगोलिक स्थान (Location) –
समुद्रसपाटीपासून सुमारे ४५० ते ५०० मी उंच असलेला हा डोंगर. सध्या डोंगरावर जाण्यासाठी पायºया बांधलेल्या आहेत. खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही चांगलीच दमछाकच होते. पायथ्यापासून वर चढण्यास सुमारे २० ते २५ मिनिटे लागतात. वाटेत सुमारे २२५ पायºया चढून गेल्यावर पायºयांचे काम अर्धवट सोडून दिलेले दिसले. १० ते १५ वर्षांपूर्वी डोंगरावर जाण्याकरिता पाऊलवाट होती. त्यामुळे डोंगरावर जाण्यास चांगली दमछाक व्हायची. अर्थातच हौशी पर्यटकांची वर्दळ कमी होती. मी सरळ मार्गाने न जाता डोंगरच्या पाऊलवाटेने जाण्यास निघालो. १० मिनिटातच वर पोचलो. वाटेतून जाताना येथून दिसणारा परिसर मोठा सुंदर दिसतो.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
शेलारवाडीची लेणी-बौद्धधमार्तील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स. नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या. ११ लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. बेडसे, भाजे, कार्ले, भंडारा या डोंगरावरील बौद्धकालिन लेण्या या काळच्या. बौद्धकालिन असलेल्या या लेण्या खोदण्यासाठी पूर्वी राजे, व्यापाºयांकडून अनुदान दिले जात असते. बहुधा या लेणीसाठी निधी अभावी कमी नक्षीकाम व विहार बांधलेले दिसून आले. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना आहे. डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत.
काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये राहण्यासाठी छोटे कक्ष, झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशी रचना आहे. माथ्यावर पोहचल्यावर उजवीकडच्या बाजूला एका विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज तेथे शिवमंदिर आहे. हाच येथील घोरावडेश्वर महादेव. मंदिराच्या आत एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. हे चैत्यगृह अगदी साधे दिसते. सभामंडप, त्यात विहार आत मध्ये ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकटही दिसते. हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर असलेली चौकट अशी चौकट कार्ला येथील लेण्यांमध्ये पाहावयास मिळते. या चैत्यगृहाच्या पुढे एक छोटी विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या बाजूला थोडे प्रस्तरारोहण करून एक मोठा प्रशस्त विहार खोदलेला आहे.
इथली लेणी मोठी असून विहारात गणपती, शिवलिंग, देवी आदींच्या मूर्ती आहेत. डोंगरातील याच लेणीमध्ये थोडेफार कलाकुसर काम केलेले दिसते. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात. सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. या विहाराच्या बाहेर दोन नंदी दिसतात. एक जुना व दुसरा नवीन कोरलेला. येथून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे दिसतो. सुब्रतो स्टेडियम लक्ष वेधून घेते. बिर्ला मंदिराकडून बांधण्यात आलेली सोमाटणे फाट्याजवळील भव्य गणेशमूर्ती दिसते. हा परिसर सुमारे अर्धा पाऊण तासात पाहून होतो.
महादेवाचे दर्शन घेऊन परत माघारी फिरलो. वाटेत डोंगराच्या माथ्यावर विटांचे बांधकाम व शेजारी कुठल्या महाराजांची पाटी दिसून आली. सध्या येथे कुणी राहत नसल्याचे दिसून आले. पुरातत्व विभागाने येथे बांधकाम कसे करू दिले हा प्रश्न पडतो. एका गुंफेमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती असून संत तुकाराम महाराजांचा एक फोटो ठेवलेला दिसला. येथे वारकरी समाजापैकी काही साधक चिंतन, मनन करताना दिसतात
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण तळेगाव दाभाडेला जाऊ शकता. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड ओलांडून तळेगावच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घोरावडेश्वर डोंगर दिसतो. याच्या पायथ्याशी छोट्याच्या टेकडीवर हे मंदिर आहे. त्यासाठी डाव्या बाजूला वळून डोंगरावर जाता येते.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
इतिहास (History) –
समुद्रसपाटीपासून हे मंदिर ३५०० फूटावर निसर्गरम्य ठिकाणी आहे. परिसरातील अनेक भक्तांच्या प्रयत्नातून १९७४ पासून या मंदिराचा विकास झालेला आहे. मंदिराची कोनशिला १४ मार्च १९७५ मध्ये देहूरोड लष्करी भागातील सीआयएसबीचे नियंत्रक ब्रिगेडियर सी. सुंदरम् यांच्या हस्ते बसविण्यात आली आहे. शारदापीठाचे जगद्गुरू शंकराचार्यमहाराज यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन २८ मे १९९५ मध्ये झाले होते. मंदिरातील मूर्ती तामिळनाडूतील वेलूर जिल्ह्यातील रत्नागिरी गाव स्थित बालमृगन मंदिराच्या कार्तिक स्वामींचे परमभक्त श्री बालमुरुगन स्वामीद्वारा दान मिळाल्या आहेत. दरवर्षी सुब्रमण्यम स्वामींच्या होणाºया सर्व उत्सवात हजारो भक्त सहभागी होतात. सुब्रमण्यमस्वामी मंदिर हे साऊथ इंडियन लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन या मंदिरात दिसून येते.
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
बामण डोह
घुमटी विहिर
पाचपांडव मंदिर
दाभाडे सरकार वाडा
इंदुरी गढी / किल्ला
लेखक – www.ferfatka.blogspot.com.
माहिती संकलन – सायली निंबाळकर.
@Marathi Explorer