घुमटाची विहीर, तळेगाव दाभाडे –
पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही घुमटाची विहीर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याचे आश्चर्यच वाटते. विहिरीजवळच्या घुमटाकार वास्तूमुळे विहिरीचं नाव ‘घुमटाची विहीर’ असे पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.
भौगोलिक स्थान (Location) –
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही विहीर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याचे आश्चर्यच वाटते. विहिरीजवळच्या घुमटाकार वास्तूमुळे विहिरीचं नाव ‘घुमटाची विहीर’ असे पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. बांधकाम घडीव दगडातच झालेले आहे.
विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आतील बाजूस मध्यभागी एक धक्का बांधलेला दिसतो. मध्यभागी दोन कमानी आहेत. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. या विहिरीवर दोन मोटी चालायच्या. त्यांचे धक्केही दिसतात. इतिहासकारांच्या मते या मोटीद्वारे शेतीला पाणी पुरवले जाई. विहिरीच्या आत छोटे शिवमंदिर आहे. विहिरीच्या बांधणीत किती मुद्दे विचारात घेतले आहेत हे पाहून आपण स्तंभित होतो.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण तळेगाव दाभाडेला जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
इतिहास (History) –
पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही विहीर.
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
बामण डोह
घुमटी विहिर
पाचपांडव मंदिर
दाभाडे सरकार वाडा
इंदुरी गढी / किल्ला
माहिती साभार – ओंकार वर्तले.
माहिती संकलन – सायली निंबाळकर.
@Marathi Explorer