गोड बुंदी
साहित्य:
बुंदी: ३/४ वाटी बेसन पीठ, ३/४ वाटी पाणी, १ टेबलस्पून तेल, चिमूटभर मीठ, तेल
पाक: ३/४ साखर, १/२ वाटी पाणी, केशर, केशरी खायचा रंग, सुकामेवा
कृती:
१. प्रथम एका भांड्यात बेसन, पाणी आणि मीठ घालून नीट फेटून घ्यावे. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. मिश्रण एकत्र करून झाले की त्यात १ चमचा तेल घालावे आणि परत नीट फेटून घ्यावे.
२. कढईमध्ये मोठ्या आचेवर तेल तापले की त्यात झाऱ्याच्या सहाय्याने बुंदी पाडून घ्यावी. थोडी कुरकुरीत झाली की एका प्लेटमध्ये काढून घ्यावी.
३. एकीकडे साखरेचा पाक करून घ्यावा. त्यात केशर, केशरी रंग टाकावा. पाक थोडा चिकट झाला की त्यात बुंदी घालावी. पाक एक तारी करू नये. हे मिश्रण २ मिनिटं परतून घ्यावे. त्यात सुकामेवा घालावा आणि गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवून अर्धा तास ठेऊन द्यावे. अधून मधून सारखे हलवून घ्यावे.
आणि प्लेटमध्ये काढून सर्व्ह करावी.
अश्याप्रकारे आपली गोड बुंदी तयार!
-Snehal Kalbhor