हंपी | Hampi

By Bhampak Travel 3 Min Read

हंपी / Hampi –

खरंतर हे ठिकाण म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तिथं जायचं, मज्जा करायची, खायचं, प्यायच, मनसोक्त जगायचं. आणि हो खरंच इथ गेलं की माणूस आपलं दुःख, आपली निराशा, आपले प्रॉब्लेम सगळं विसरून तिथं रमत जातो. नाही हे ना ठिकाणचं तसं आहे, अन् आता तर हे वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित पण केलंय.

प्रत्येकानं हंपी ला एकदा तरी जाऊन यावं मरण्याचं आधी. काही गोष्टी, काही स्वप्न असतात ना की जे आपण करण्या साठी आयुष्यभर धडपडत असतो त्यात हे पण एक जोडाव असं मला तरी वाटतं.

अन् खरंच इथ जगणं म्हणजे काही निराळा आहे. इथली लोकं, इथली माती, इथली संस्कृती प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन शिकवत असते. काही शोध आहेत , काही तेकनिक हे आपल्याला वाटत की सगळं आताच आलाय पण नाही असं बिलकुल नाही कारण या गोष्टी तुम्हाला इथ जागोजागी बघायला मिळतात. इतिहास, युद्ध, प्रेम, दंतकथा, भूगोल, पाककला सगळं सगळं अगदी मनसोक्त अन् अभ्यासपूर्ण विवेचन इथ दिसेल तुम्हाला. काही गोष्टी विलक्षण आहेत तर काही अविश्वसनीय आहेत.

एक महत्त्वाची आणि अत्यंत भारी गोष्ट काय आहे माहितीये इथे जी की मला सर्वात जास्त आवडते अन् बेस्ट वाटते. इथं एवढी मंदिरे, ठिकाणं आहेत की ते सर्व बघायला तुम्हाला जवळ जवळ ७-८ दिवस पण कमी पडतील एवढी आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण इथल्या बहुतांश सगळ्याचं म्हणजे सगळ्याच ( काही मंदिरे सोडून) मंदिरात मूर्तीच नाहीयेत. नवल वाटलं असेल ना पण हो हे अगदी खरं आहे. मला ही गोष्ट खुप आवडते.

कारण कसे आहे ना की इथल्या मंदिराला त्यांचं महत्त्व पटवून द्यायला कुठल्या मूर्तीची गरज पडत नाही. आजकल माणसाला आपलं चांगुल पणा सिद्ध करायला खुप गोष्टी कराव्या लागतात. कसं असतं ना माणसाला स्वतःच माणूसपण सांगावं लागण यापेक्षा वाईट गोष्ट जगात कुठलीच नाही.

” मूर्ती विना मंदिर अन् मंदिरा शिवाय देव जेव्हा आपल्याला समजायला लागेल ना तेव्हा आपल्याला जगात कुठलीही गोष्ट समजून सांगावी याची गरज पाडणार नाही. ”

खुप छान, महत्त्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळतील.

एकदा हे सगळं ठीक झालं ना नक्की हंपी विजीट कराच. ४-५ दिवस मस्त, बिंदास्ट जगायचं . स्वतःला स्वतमध्ये शोधण्यासाठी जावं एकदा.

” आपण आपलं जगणं स्वैर जगलो ना,

मग स्वतःच स्वतः मधले वैर कमी होत जातं…!”

– रत्नदिप रंगनाथ कागदे

Leave a comment