हुतात्मा भगतसिंह – भाग 1

By Team Bhampak Articles 2 Min Read
हुतात्मा भगतसिंह

हुतात्मा भगतसिंह – भाग 1

कुछ आरझू नहीं है,है आरझू तो यह
रख दे कोई जरासी खाक-ए-वतन कफन में

अश्फाकउल्ला खान यांच्या या ओळी..क्रांतिकारकांचे एकूण जीवनच हे अभ्यासन्याचा विषय.देशाला लाभलेले क्रांतिकारी हे या देशाचे भाग्य आणि त्यांच्याविषयी आपल्याला जाणीवही असू नये हे आपले दुर्भाग्य..
भारतात राहणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आदर्श म्हणजे भगतसिंह.
ज्या वयात आपल्याला समाजातील आपल्या जबाबदारीची काही प्रमाणात जाणीव होण्याची सुरूवात होते,त्या वयातील भगतसिंहांचे विचार,त्यांची राष्ट्रनिष्ठा,त्यांचे नीतीमुल्ये आपल्याला आश्चर्यचकित करतात.खरेतर भगतसिंह,राजगुरू,सुखदेव हे आम्हा वाटा चुकलेल्या तरुणांना दिशा दाखवणारे मार्गदर्शकच..
लहान वयात एका ब्रिटिश अधिकाऱ्याला शाळेमधे सलूट करण्यास नकार देणाऱ्या सुखदेवांचे हे वागणे,त्यांनी क्रांतीच्या यज्ञात दिलेल्या आहुतीची एक छोटी ओळख सांगून जाते..!!
तरुणांच्या हातात भारताचे भविष्य आहे,हा दुर्दम्य विश्वास भगतसिंहांना होता..
शेतकरी व मजूर यांचे प्रश्न सोडवन्यासाठी त्यावेळेस त्यांनी मांडलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात..

ब्रिटिश राजवट जाण्याचा अर्थ केवळ सत्ताधीश बदलणे एवढाच असेल,तर त्यामुळे जनतेच्या स्थितीत फारसा फरक पडणार नाही याची जाणीव भगतसिंहांना होती.देशाच्या प्रगतीच्या आड येणारी भारतातील परंपरागत व्यवस्था बदलल्याशिवाय कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही,हे त्यांचे मत होते.ही व्यवस्था मोडून काढली पाहीजे आणि केवळ क्रांतीच हे काम करू शकेल हे त्यांचे ठाम मत होते.याबद्दल त्यांना खात्री होती.अखेरपर्यन्त ते आपल्या तत्वावर चालले..
शेवटी,या तीनही क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेऊन फैज अहमद फैज यांनी रचलेल्या काही ओळी आठवतात..

“जिस धज से कोई मकताल में गया
वह शान सलामत रहती है ।
ये जान तो आती-जाती है,
इस जान की कोई बात नहीं ।।”

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment