हुतात्मा भगतसिंह – भाग 2

By Team Bhampak Articles 5 Min Read
हुतात्मा भगतसिंह

हुतात्मा भगतसिंह – भाग 2

‘मॉंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा’ या नावाखाली एक शिष्टमंडळ भारतात येणार होते.भारत स्वराज्यासाठी किती तयार आहे,घटनात्मक सुधारणा स्विकारण्यात कितपत तयार झाला आहे याची पाहणी करण्यासाठी या कायद्याची निर्मिती केली होती.यातच,एक शिष्टमंडळ मुंबई वरून लाहोरला 30 ऑक्टोबर 1928 रोजी आले.या मंडळाला विरोध करण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला होता आणि लाला लाजपतराय यांनीही विरोधाची भूमिका घेतली होती.
लालाजींच्या भूमिकेला भगतसिंह आणि क्रांतिकार्यांनी पाठिंबा देण्याचे ठरवले.काहीतरी ठोस कृती केली पाहिजे, हे भगतसिंहांचे मत होते.घटना छोटी असली तरीही सारा देश जागा होतो म्हणून कृती महत्वाची..

शिष्टमंडळ सर जॉन अलब्रुक्स सायमन नावाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली लाहोर रेल्वे स्टेशन बाहेर आले होते.बाहेर हजारोंच्या संख्येने लोकांचा जमाव जमला होता..लोकांमधून,
‘हिंदुस्थानी है हम,हिंदोस्ता हमारा
मूड जाओ सायमन,जहाँ देश है तुम्हारा’
हे गीत उस्फुर्तपने गायल्या जात होते..

सायमन गो बॅक च्या घोषणांबरोबर ‘इन्कलाब जिंदाबाद’ च्या घोषणा लोकांमधून येत होत्या..क्रांतीच्या लढ्याला निर्णायक परिणाम यावा,म्हणून भगतसिंहांनी ही घोषणा तयार केली होती.
शिष्टमंडलातील सदस्य निघुन जात असताना,’जर लोकांना भेटायचेच नव्हते तर डोळ्यावर पट्टी बांधून यांना आनायचे होते’ असे उद्गार लालाजींनी काढले..मग मात्र पोलिस अधीक्षक जे.एस.स्कॉट याने लाठीमारीचे आदेश दिले आणि स्वता लालाजींच्या अंगावर हातातल्या काठीनिशी धावला..यात लालाजी गंभीर जखमी झाले..बेशुद्ध अवस्थेतच लालाजींनी उदगार काढले,
‘आज आम्हाला मारलेला प्रत्येक फटका ब्रिटिशांच्या शवपेटीवरचा एक एक खिळा ठरेल’

काही दिवसांनी,17 नोवेंबर रोजी लालाजींचा दुर्दैवी मृत्यु झाला..लाला लाजपतराय आणि भगतसिंह यांच्यात अनेक वैचारिक मतभेद होते..पण त्यांच्याविषयी प्रत्येक क्रांतिकारकाच्या मनात कमालीचा आदर होता..भगतसिंहांचे काका सरदार अजित सिंह यांना लालाजींसोबत शिक्षा झाली होती.भगतसिंह आणि त्यांच्या सहकार्यांच्या मनात असलेली लालाजींविषयीची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती..
मोझांग रोड,लाहोर येथील कब्रस्थानाजवळील भाड्याने घेतलेल्या एका घरात भगतसिंह आणि सहकार्यांची एक बैठक भरली होती..क्रांतिशिरोमणि चंद्रशेखर आझाद यांना तातडीने बोलावन्यात आले होते..लालाजींच्या हत्येचा निषेध निदर्शने,मोर्चे काढून अजिबात करायचा नाही यावर सर्वांचे एकमत झाले होते..आणि त्याच वेळेस,दुर्गाभाभी यांनी स्कॉट ला मारण्याचा ठराव मांडला आणि ती जबाबदारी स्वीकारन्याचीही तयारी दाखवली..आधीच जालियाँवाला बागेत अमानुष कृत्य करणाऱ्या जनरल डायरची सुटका झाली होती,पण स्कॉटला सुटू द्यायचे नाही,हे भगतसिंहांच्या मनात सारखे येत होते..दुर्गाभाभी यांच्या योजनेमुळे सर्वांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक निर्माण झाली..ठरले..स्कॉटला ठार मारून लालाजींच्या हत्येचा बदला घ्यायचा..

HSRA चा मास्टरमाइंड म्हणजे सुखदेव थापर..त्याने सारी योजना बनवली.स्कॉटचा मारण्याची जिम्मेदारी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यावर देण्यात आली..आझादांनी या दोघांना संरक्षण द्यायचे आणि पळून जान्यात या दोघांची मदत करायची..आणि या कामगिरी मधील सर्वात महत्वाची जिम्मेदारी जयगोपाल याच्यावर देण्यात आली,ती म्हणजे स्कॉटला ओळखने..जयगोपाल मात्र स्कॉटला ओळखत नव्हता..पण त्याच्यावर पडलेली ही पहिलीच कामगिरी हातातून जाईल या भीतीने त्याने या गोष्टिविषयी कुणालाही सांगितले नाही आणि ह्या प्रकरणा मधे कमालीचा गोंधळ पुढे निर्माण झाला.

कारवाईची तारीख ठरली,17 डिसेंबर 1928..लालाजींच्या मृत्युच्या बरोबर 1 महिन्याने..पण नेमके त्याच दिवशी स्कॉटची सासू भारतात आल्याने स्कॉटने रजा घेतली होती,त्याजागी आला होता जे.पी.सैंडर्स..सहाय्यक पोलिस अधीक्षक..
सकाळी 10 वाजता सैंडर्स ठाण्यात आला आणि जयगोपालने हाच स्कॉट समजून भगतसिंह आणि राजगुरू यांना इशारा केला..दुपारी आपले काम आटपुन सैंडर्स बाहेर आला.आपली गाडी काढून निघनार तितक्यात राजगुरू यांनी सैंडर्सवर आपल्या मौझेर पिस्तूलमधून गोळी झाडली..हा स्कॉट नाही,हे भगतसिंहांना समजले होते..पण तोपर्यंत फार उशीर झाला होता..राजगुरू शार्प-शूटर होते..त्यांनी डागलेल्या गोळीने अचूक काम केले होते..भगतसिंह यांनीही मग त्यावर गोळ्या झाडल्या आणि ते DAV कॉलेज कड़े पळू लागले..तितक्यात,ठाण्यामधून जे.जी.फर्न नावाचा अधिकारी या दोघांच्या मागे पळू लागला..भगतसिंह आणि राजगुरू यांना संरक्षण देणाऱ्या आझादांनी 2 गोळ्या फर्नच्या दिशेने झाडल्या..ज्या त्याच्या कानाजवळून गेल्या..मग त्याने कॉन्स्टेबल चननसिंह याला या तिघांच्या मागे पाठवले..भगतसिंह यांनी ‘आम्ही कोणत्याही भारतीयावर हल्ला करणार नाही,वापस जा’ असे ओरडून सांगितले.पण त्याने पाठलाग सोडला नाही..मग मात्र राजगुरु यांनी त्याला ठार केले..

D.A.V. कॉलेज आणि होस्टेलच्या मधल्या भिंतीजवळ या तिघांनी साईकल ठेवल्या होत्या..त्यावर बसून अगदी बेमालूमपने ते मोझांग रोडवरील त्यांच्या घरी निघुन गेले..हा सारा प्रकार प्रसिद्द उर्दू कवि फैज अहमद फैज पाहात होते.

एव्हाना जयगोपालच्या एका चुकीमुळे मोठा गोंधळ झाला होता..साऱ्या शहरभर स्कॉट मारल्याचे पत्रक पसरले होते..जिथे जिथे शक्य होते,तीथे तीथे भगतसिंह यांनी स्कॉटचे नाव खोडून सैंडर्स असे केले..पुढे भगतसिंह यांनी केलेल्या या लिखानाचा वापर त्यांच्याच विरोधात पुरावा म्हणून करण्यात आला..
भगतसिंहांनी लिहिलेल्या त्या पत्रकात आपल्या कृत्याचे समर्थन फार उत्तम पद्धतीने मांडले आहे..
शेवटच्या उतारामधे भगतसिंह म्हणतात,

‘एका माणसाचे रक्त सांडल्याबद्दल आम्हाला खेद आहे,पण अशा व्यक्तिगत बलिदानातूनच क्रांती आकार घेईल आणि त्यातून स्वातंत्र्य येईल.असे स्वातंत्र्य,की त्यात माणसांचे मानसाकडून होणारे शोषण पूर्णपणे थांबेल….

क्रांती चिरायू होवो..!!

कमांडर इन चीफ
बलराज
दिनांक : 18 ऑक्टोबर 1928

फोटो :
1- सरदार भगतसिंह
2- जे.पी.सैंडर्स
3-लाला लाजपत राय जखमी अवस्थेत
4-भगतसिंह यांनी सैंडर्सला ज्या बंदुकिने मारले ते मौझेर पिस्तूल
5-त्यावेळेसचे DAV कॉलेज आणि आत्ताच इस्लामिया कॉलेज,लाहोर
6-SSP ऑफिस,लाहोर याच ऑफिस समोर सैंडर्सला मारण्यात आले
7-सायमन कमीशन विरोधात निघालेला एक मोर्चा..

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment