हुतात्मा भगतसिंह – भाग 3

By Team Bhampak Articles 6 Min Read
हुतात्मा आणि गांधीजी

हुतात्मा भगतसिंह – भाग 3
भगतसिंह आणि गांधी-नेहरू : समज-गैरसमज

‘A clear fighter who faced enemy in open field’
हे उद्गार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे,भगतसिंह यांच्याविषयी..तळपत्या मशालीप्रमाणे या देशाचा अंधाराने व्यापलेला कानाकोपरा भगतसिंहांनी आपल्या विचारांनी उज्वलित केला असे म्हणनारे नेहरू मात्र आज आम्ही भगतसिंह विरोधी म्हणून मांडतो..

दिनांक 19 मार्च 1931 रोजी लॉर्ड आयर्विन यांच्याशी झालेल्या चर्चेमधे भगतसिंहांचा मुद्दा गांधीजींनी मांडला..भगतसिंहांची जवळ येणारी फाशी काही काळासाठी तरी निलंबित करावी,अशी अपेक्षा त्यांनी आयर्विनकडे व्यक्त केली..पण ही चर्चा निष्फळ ठरली..या तीन क्रांतिकार्यांना फाशी दिल्यावर भारतामधे अस्थिरता निर्माण होईल,अशी कल्पना देऊनही आयर्विन याने कसल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेतली नाही..20,21 आणि 22 मार्चपर्यंत गांधीजींनी आपल्या मागणीचा पाठपुरावा केला..
अखेरीस,दिनांक 23 मार्च रोजी त्यांनी आयर्विनला एक पत्र लिहीले.गांधीजी म्हणतात,
“सर्व जनतेची इच्छा आहे,की फाशी रद्द व्हावी.सरकार हे नेहमीच जनमताचा आदर करीत आले आहे.जर फाशी रद्द झाली तर या देशात शांतता नांदेल.अन्यथा लोकांकरवी शांततेस धोका पोहोचेल.इतर सर्व क्रांतिकारकांनी त्यांच्याकडून होणाऱ्या राजकीय हत्या थांबवन्याचे वचन दिले आहे.त्याबदल्यात,या क्रांतिकारकांची फाशी रद्द व्हावी,हीच अपेक्षा..आणि माझीही तुम्हाला ही विनंती आहे.”
अर्थात या पत्राला ‘मी काही करण्यास असमर्थ आहे’ असे उत्तर आयर्विनने पाठवले..

एवढे होऊनही गांधीजींनी भगतसिंहांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले नाहीत,हा आरोप केला जातोच..
भगतसिंह आणि त्यांच्या सहकार्यांच्या बलिदानाप्रीत्यर्थ झालेल्या लाहोर येथील राष्ट्रीय सभेत बोलताना पंडितजी म्हणाले होते,की
‘ज्या धैर्याने भगतसिंहांनी मृत्युला तोंड दिले आहे,त्याची कोठेही तुलना नाही.जेव्हा इंग्रज आणि आमच्यामधे समेटाची भाषा होईल,तेव्हा आमच्यामधे भगतसिंहांचे प्रेत असेल..त्यांच्या बलिदानाचा विसर आम्हाला कदापिही पडणार नाही.’

जेव्हा सरदार भगतसिंह यांच्या सुटकेसाठी त्यांचे पिता किशनसिंह यांनी फाशी स्थगित करण्याचा अर्ज केला होता,तेव्हा ही गोष्ट भगतसिंहांना समजल्यावर ‘माझ्या वडिलांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ या शब्दात त्यांच्या कृत्याचा निषेध केला होता..
वास्तविक,भगतसिंह यांचीच मुळात फाशी रद्द न होण्याची इच्छा होती..आपल्याला फाशी दिल्यामुळे आपल्या तत्वज्ञानाला उजाळा मिळेल आणि जास्त लोकांचा पाठिंबा मिळेल असे भगतसिंहांना वाटत होते.त्यामुळेच ते फासावर जायला उत्सुक होते.आपल्या बलिदानामुळे अनेक तरुण सहभागी होऊन देशाला लवकर स्वातंत्र्य मिळवून देतील,असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच त्यांची फासावर जाण्याची तयारी होती.भगतसिंह यांची माफी मागण्याला अथवा अपील करण्यासाठीही नकार दिला होता.
एवढेच नव्हे,तर 22 मार्च रोजी आपल्या सहकार्यांना लिहिलेल्या पत्रात भगतसिंह स्वता म्हणाले होते,की त्यांना फासावर जान्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही..

मग गांधीजींमुळे भगतसिंह,सुखदेव,राजगुरू यांचा बळी गेला हे विधान करने कितपत योग्य?
या भारताला एक पंडित नेहरू सोडले,तर शेतकरी व कामगार यांना संघटित करणारा दुसरा एकही नेता नाही..हे वाक्य आहेत खुद्द भगतसिंह यांचे..तरुण कार्यकर्त्यांना आवाहन करताना भगतसिंह यांनी पंडितजींविषयी हे उदगार काढले होते..आता जिथे भगतसिंह स्वता पंडितजीविषयी आदरार्थी उद्गार काढत आहेत,तीथे आपण त्यांच्यावर कशाआधारे बिनबुडाचे आरोप करतो?

भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या बलिदानामुळे एक सभा भरवन्यात आली होती..तेव्हा जमलेल्या लोकंसमोर सुभाषचंद्र बोस म्हणाले,
“त्यांच्या क्रांतीच्या मार्गाचे मी समर्थन करत नाही.तरीही त्यांनी दाखवलेले असीम शौर्य आणि असीम देशभक्ती यात मुळीच शंका नाही.ते अखेरपर्यंत देशासाठी एक प्रेरणादाई व्यक्ती राहतील”
आता,सुभाषचंद्र बोस जर त्यांच्या मार्गाचे समर्थन करीत नाही असे म्हणाले,तर त्यांना भगतसिंहाविरोधी ठरवनार का?

भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरुंगामधे आपल्या न्यायहक्कासाठी तब्बल 66 दिवसांचे उपोषन केले होते..उपोषणामधुन आपल्या मागण्या मान्य करण्याची शांततेची,अहिंसेची संकल्पना खरेतर गांधीजींची पण तिचा स्वीकार करण्यात भगतसिंह यांना कुठेही कमीपना वाटला नाही.कारण दोघांचे मार्ग जरी वेगळे असले,तरी उद्दीष्ट एकच होते..!!

वास्तविक,क्रांतिकाराकांचे तत्वज्ञान हे वेगळ्या स्वरूपाचे आहे.अहिंसेचे तत्वज्ञान हे हिंसेच्या पूर्ण विरोधी होते.गांधीजी जर भारताच्या क्षितिजावरचे सुपुत्र होते तर भगतसिंह हे खोल अंधारातून उदयाला आलेला तेजस्वी तारा..त्यामुळे त्यांच्यामधे तुलना कशी होऊ शकेल?
क्रांतिकारकांच्या इतिहासात क्रांतीची व्याख्याच जर कुणी बदलली असेल तर ती भगतसिंह यांनी..काळाच्या पुढे पाहून आपले विचार मांडणाऱ्या या तत्ववेत्याच्या नावाखाली आज भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या वीरांची अवहेलना केली जाते..
मी काही कॉंग्रेसचा कार्यकर्ता नाही अथवा गांधीवादीही नाही..पण त्यांनी केलेले कार्य नाकारत नाही..

भगतसिंह वाचले असते तर..गांधीजींनी वाचवले असते तर,अशा निरर्थक चर्चेमधे अडकन्यापेक्षा भगतसिंह यांनी केलेल्या कार्याची जाणीवही आपल्याला झाली,तरी ती त्यांना खरी श्रद्धाजंली ठरेल..
देशहितासाठी मी ठरवलेल्या कार्यपैकी 1000 वा भागही पूर्ण करू शकलो नाही,ही खंत भगतसिंह यांच्या मनात अखेरपर्यन्त होती..
तरुणांच्या खांद्यावर या देशाचे भविष्य पाहणाऱ्या भगतसिंहांच्या विचारांतील तरुण आज मात्र कुठेच दिसत नाही..दिसतो तो फक्त द्वेषापोटी आणि धार्मिक मुद्द्यांवरून भगतसिंहांच्या नावाचा वापर करणारा बेजबाबदार युवक..

कराचीमधे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते.त्यात भगतसिंह यांच्या वडिलांनी भाषण केले.ते म्हणाले,
“हम से भगत ने कहा था की तुम परेशान न हो । मुझे फाँसी लगने दो,यही ठीक है । हमें फासी लगी तो एक हप्तेमेंही स्वराज मिल जायेगा । वो कहता था की प्रीवी कौंसिल में जाने से कोई फायदा नहीं क्योंकी गुलामों को सिकायत करने का हक नहीं है ।”

भगतसिंह समजून घ्यायचे असतील,तर आधी त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील..आणि त्यांच्या आदर्श विचारांवर उभारलेला समाज हीच त्यांना दिलेली खरीखुरी आदरांजली असेल..!!

इन्कलाब जिंदाबाद..
भगतसिंह जिंदाबाद..
सुखदेव जिंदाबाद..
राजगुरू जिंदाबाद..!!

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment