हुतात्मा भगतसिंह – भाग 4
भगतसिंह,लाहोर सेंट्रल जेल आणि पाकीस्तानमधील चळवळ
सरदार भगतसिंह,राजगुरु आणि सुखदेव यांना ज्या तुरूंगात ठेवण्यात आले,जिथे त्यांचे अखेरच्या काळातील वास्तव्य होते आणि ज्या ठिकाणी या तिघांनाही फाशी देण्यात आली ते लाहोर सेंट्रल जेल आज काहीसे भारतीय लोकांसाठी विस्मृतीत गेले आहे.
या जेलच्या ज्या भागात भगतसिंग यांना ठेवण्यात आले होते,त्या ‘फांसी की कोठी’ ला शहीद भगतसिंह यांचे नाव देण्यात यावे म्हणून ‘चौधरी अफजल’ यांनी कोर्टात कायदेशीर लढा दिला आणि 14 नोवेम्बर 2008 मधे त्यांना यश मिळाले.त्या वार्ड ला शहीद भगतसिंह यांचे नाव देण्यात आले.
कारागृहाच्या परीसरातजी वसाहत निर्माण झाली आहे,तिला ‘शदमन’ असे नाव देण्यात आले आहे.शदमन म्हणजे सुखाचा सागर.तेथील शदमन चौकाला ‘शहीद भगतसिंह चौक’ असे नाव देण्यात यावे,म्हणून पाकीस्तान येथील जनतेने आंदोलन केले.भगतसिंह यांचे फोटो,त्यांच्या नावाचे फलक घेऊन सारी जनता रस्त्यावर उतरली होती.अजूनही कोर्टात या गोष्टीवर सुनावणी चालू आहे.
ज्या भगतसिंग यांना आज आपण केवळ जयंती अथवा त्यांच्या शहीद दिनासाठी लक्षात ठेवतो,गांधी,नेहरू यांना विरोध करण्यासाठी ज्यांच्या नावाचा वापर करतो,त्याच भगतसिंग साठी तिकडे पाकिस्तानी जनता आंदोलनासाठी रस्त्यावर उतरते,नक्कीच हा विरोधाभास आहे..
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची