हुतात्मा भगतसिंह – भाग 5

By Team Bhampak Articles 3 Min Read
हुतात्मा भगतसिंह

हुतात्मा भगतसिंह – भाग 5

भगतसिंह,इन्कलाब आणि क्रांतीची व्याख्या : द्रष्टा कॉम्रेड

हुतात्मा यतीन्द्रनाथ दास यांचा उपोषण करत असताना कारागृहात मृत्यु झाला.त्यांच्या हौतात्म्यानंतर साऱ्या भारताने त्यांना अभिवादन केले आणि त्यावेळेस सर्वांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या..तेव्हा ‘मॉडर्न रिव्ह्यू’चे संपादक असणाऱ्या रामानंद चट्टोपाध्याय यांनी या घोषणेवर टिका केली म्हणून भगतसिंह यांनी या टीकेला उत्तर दिले होते..हे उत्तर जरी त्या संपादकाला असले,तरीही त्यामधे भगतसिंह यांनी मांडलेले विचार,क्रांतीची व्याख्या हे सर्व काही भगतसिंह सशस्त्र क्रांतीमधे आमुलाग्र बदल करण्यास कारणीभूत का होते,याचे उत्तर मिळते..

पत्राच्या सुरुवातीला भगतसिंह म्हणतात,
‘आजच्या स्थितीला ही घोषणा लोकांपर्यंत पोहोचवन्याचे कार्य आमच्या वाट्याला आले आहे.या घोषणेचा अर्थ काय?सशस्त्र संघर्ष सदैव चालू राहो आणि कोणतीच व्यवस्था थोड्या वेळासाठी स्थिर न राहो,असा अजिबात नाही.दुसऱ्या शब्दात,देशात व समाजात अराजकता पसरावी,हाही नाही.

एखाद्या व्यक्तीच्या नावाने आपण जेव्हा घोषणा देतो,तेव्हा त्यामागे काय अर्थ दडला आहे,याविषयी भगतसिंह एक उदाहरण देऊन लिहितात,
‘जेव्हा आम्ही यतींद्रनाथ जिंदाबाद अशी घोषणा देतो तेव्हा आमच्यासाठी याचा अर्थ असा असतो की, ज्या आदर्शानसाठी या महान हुतात्म्याने सांगताही येत नाहीत अशा हालअपेष्टा झेलल्या,तसेच असीम बलिदानाची प्रेरणा दिली,त्यांच्या जीवनाचे महान आदर्श आणि त्यांचा अदम्य उत्साह हे निरंतर टिकून राहोत.’तेव्हा,इन्कलाब ही घोषणा आम्ही जेव्हा देतो,तेव्हा आम्हीसुद्धा आपल्या आदर्शानकारिता निरंतर उत्साहाने लढण्याच्या आमच्या उत्कट भावना प्रकट करीत असतो..ही तीच भावना आहे जीचा आम्ही गौरव करतो.अशाच रीतीने इन्कलाब या शब्दाचा अर्थ आपन केवळ कोरडया शाब्दिक स्वरुपात लावता कामा नये.क्रांतिकारकांच्या दृष्टीने हे एक पवित्र वाक्य आहे.

सशस्त्र आंदोलन अथवा बॉम्ब आणि पिस्तूल यांच्या आधारावर क्रांती होऊ शकेल का,या गोष्टीवर भगतसिंह यांनी मांडलेले विचार आजही आपणास अचंबित करतील,इतका खोल अर्थ यामधे दडला आहे..
भगतसिंह म्हणतात,
‘क्रांतीचा अर्थ अटळपणे सशस्त्र आंदोलन असा होतो असे नाही.बॉम्ब आणि पिस्तूल कधीकधी क्रांती यशस्वी करण्यासाठी केवळ साधन बनू शकतात.यात शंका नाही की काही आंदोलानांमधे बम आणि पिस्तूल ही फार महत्वाची ठरतात,पण म्हणून केवळ एवढ्या कारणाने बॉम्ब आणि पिस्तूल हे क्रांतीला पर्यायची होऊ शकत नाहीत.
‘विद्रोहाला क्रांती म्हणता येणार नाही’
तथापि,असेही घडू शकते,की
‘विद्रोहाची अंतिम परिणती क्रांतीमधे होऊ शकेल.’

इन्कलाब जिंदाबाद या वाक्यात ‘क्रांती’ या शब्दाचा अर्थ ‘प्रगतीसाठी परिवर्तनाची इच्छा आणि आकांक्षा’ असा आहे..
मनुष्य जातीचा आत्मा हा क्रांतीच्या या भावनेने ओतप्रोत भरलेला असावा..असे म्हणताना भगतसिंह सर्वात शेवटी लिहितात,

“जुनाट व्यवस्था सदैव टिकून राहु नये आणि तिने नव्या व्यवस्थेसाठी जागा रिकामी करीत राहणे,हे आवश्यकच आहे.त्यामधुन जगाला नासवन्यापासून वाचवनारी एक आदर्श व्यवस्था पुढे येऊ शकेल.आम्ही ‘इन्कलाब जिंदाबाद’ ची घोषणा जेव्हा बुलंद करत असतो,तेव्हा आमच्या हृदयात हा आशय भरलेला असतो.”

जेव्हा आम्ही भगतसिंह यांच्या नावाच्या घोषणा देतो..छत्रपती शिवरायांच्या नावाच्या घोषणा देतो..तेव्हा आमच्याही मनात अगदी हीच भावना असते..त्यांनी दिलेल्या असीम बलिदानाची प्रेरणा,त्यांचे महान आदर्श आणि त्यामधुन कार्य करायला आणि समाजात विचारांची क्रांती करण्यासाठी आम्हाला मिळणारा उत्साह….

#द्रष्टा_कॉम्रेड
#आम्हीच_ते_वेडे

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a comment