दुर्बलता | Infirmity | Weakness

By Bhampak Articles Laxman Asbe 2 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

दुर्बलता | Infirmity | Weakness…

दुर्बलता हे जीवनातील सर्वात मोठे दारिद्र्य आहे, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो.

आर्थिक दुर्बलता – माणसाला लाचार व्हायला भाग पाडते.
शारीरिक दुर्बलता – माणसाला कमजोर बनायला भाग पाडते.
मानसिक दुर्बलता – माणसाचे धैर्य संपविते आणि
ज्ञाना विषयीची दुर्बलता – माणसाला परावलंबी व्हायला भाग पाडते.
दुबळा माणूस सबलाची शिकार असते, हा निसर्गाचा नियम आहे. आपली प्रगती सर्व पातळीवर होत असेल तर ती समृद्धी आहे.

आज आपण श्रीमंत होण्याच्या मागे लागलो आहोत आणि सुरक्षेच्या बाबतीत अतिशय गाफील आहोत कारण एक आर्थिक सबलता सोडली तर आपण सर्व बाबतीत दुर्बल होत चाललो आहोत. आपले स्वतःचे मन आणि मनगट दोन्ही बळकट असल्याशिवाय आपल्या जीवनातील आपण मिळविलेले काहीच सुरक्षित नाही .

ज्याच्याकडे जे कमी आहे तो ते मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतो. कष्ट करून मिळत नसेल तर,
फसवून, लुटून, दादागिरी करून आपली गरज भागविणारे आज संखेने खूप जास्त झालेले आहेत. यांचा त्रास नेहमी चांगल्या पण दुबळ्या लोकांना सतत होत असतो, म्हणूनच दुर्बलता/weakness हे जीवनातील सर्वात मोठे दारिद्र्य आहे .

आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास हा नेहमी आपल्या सर्वांगीन सबलतेवर म्हणजे समृद्धीवर मोजला पाहिजे आणि तशी आपण स्वतःला सवय लावून घ्यायला हवी. हातात असलेले शस्त्र चालवायलामन आणि मनगट दोन्ही बलवान असावे लागते. मन आणि मनगट बलवान असेल आणि ज्ञानाच्या बाबतीत आपण दुर्बल असेल तर आपल्या हातून अत्याचार आणि ‍अन्याय होऊ शकतो, म्हणून ज्ञानाची सबलता आवश्यक आहे .

आपण स्वतःला ज्या दिवशी जीवनातील कोणत्याही संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी समर्थ आहोत, हा आत्मविश्वास आपल्याला येईल, त्या दिवशी आपण स्वतःच्या जीवावर सुरक्षित आहोत. आपली कोणाला भीती वाटत नसेल, उलट आपला आधार वाटत असेल तर हा खरा दुर्बलतेवरचा विजय आहे आणि आपल्या सर्वांगीन सबलतेचा पुरावा आहे. नराचा नारायण होणे हा खरा व्यक्तीमत्वाचा विकास आहे, नराचा वानर होणे ही अधोगती आहे.

सरव्यपणे अर्जून नरनारायण ।
सृष्टी जनार्दन एक रूप ।।

‍आपली दुर्बलता‍ ही आपल्याला माहित असते , ती दुसऱ्याला माहित झाली की आपली शिकार निश्चित आहे.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार

Leave a comment