झटपट मूग चाट
साहित्य:
मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, शेव, चाट मसाला, सैंधव
कृती:
१. प्रथम एक वाटी मूग गरम पाण्यात उकडून घ्यावे.
२. एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो थोडी शेव आणि चाट मसाला घालून मिक्स करून घ्यावे.
३. त्यात उकडलेले मूग निथळून (पाणी काढून) घ्यावेत.
४. सर्व मिश्रण एकत्र करून सर्विग डिश मध्ये सर्व्ह करावी.
अशाप्रकारे आपले मूग चाट तयार!
Spicy 😋😋