अस बरंच आहे साठलेलं…

By Team Bhampak Entertainment Poem 1 Min Read
bhampak post

अस बरंच आहे साठलेलं
भेटल्यावर बोलू म्हणून राहिलेलं…
तुझ्यावर लिहिताना अर्धवट उरलेलं
बोललेल्या भावनांमधून सुरलेलं
रात्रीच एक स्वप्न सजलेलं
स्वप्नात माझ्यावर रुसलेलं
असं बरंच आहे साठलेलं…
तूझी नजर चुकवून माझ्या नजरेत लपलेलं
आज पर्यंत तुला कधी न कळलेलं
असं बरंच आहे साठलेलं
भेटल्यावर बोलू म्हणून राहिलेलं….

– भंपक Aj ❤

 

अबाेल तु
अस्वस्थ मी…
अक्षर तु
शब्द मी…
सूर तू
गीत मी…
पेन तू
वही मी…
सरते तू
उरतो मी…
सांग ना रे मना
समजेल का तिला माझ्या खुणा…
– भंपक Aj ❤

Leave a comment