मन्नत मध्ये जम्मत

bhampak-banner

मन्नत मध्ये जम्मत –

स्थळ : शाहरुखच घर (मन्नत)

गौरी – (गाऊन वर भांडी घासत, रागाने बनियन वर टिव्ही पाहत बसलेल्या शाहरुख ला )

३ वर्ष झाली रोज म्हणतीये माझ्या भनीच्या दिराकड एक बाबा आहे त्याला दाखवू तर ह्यो मानस ऐकण तर खर…

शारुख – ( रिमोट च्या ढुंगणावर फटका मारत ) काय खर नसत हे बाबा बुवा…

गौरी – ( विम बार भिंतीवर आपटत )

तुमचंच खर ए.. धा पीच्चर झाले.. धा वर्षात…कुत्र नाय आल साधं बघायला…तुम्हाला तरी आठवतेत का नाव पीच्चरची…आरू ला धरून नेल…(ढसाढसा रडत…ओढणीने नाक पुसत ) काय खात आसन माज पोर…त्याला स्पिनच, ब्रोकोली शिवाय जमत नाय…माय…ह्यो बघा धुढ हल्तोय का जागेवरून…

शारुखं – ( पेपर गुंडाळत ) आता काय मी म्हणलेलो का जाऊन ड्रग घे…पिचर चालले…तू नाय बघितले म्हणजे दूनियानी नाही बघितले अस नस्तय…

करण जोहर दार वाजवतो…

करण – यू का ?

गौरी – ( साखरेचा डबा हलवत ) या भाऊजी…भाऊजी..

माझ्या पोराला देत अस्तेन का ओ नीट जेवायला…लै नाजूक ए…मिरची पावडर जास्त झालेली तर तास भर शिकत व्हता…

शारूख – मी चढवला होता डोक्यावर ??? तुला धा वेळा सांगितलेलं नको दयु पैशे…नको दियू गाडीची चावी तर लै… फान फान करायची..

भोगा फळ…

गौरी – ( गॅस पेटवत ) नाय मड्यावर न्यायचं हाय मला बांधून सगळं…पोराला नाय तर काय ह्या नाच्याला दिऊ तुमच्यासारख…

करण जोहर (पायावर ठेवलेला पाय खाली करून)  मी येतो वहिनी…तुमचं महत्वाचं बोलणं चालू आहे..उगा डिस्टर्ब…

गौरी –  तुम्ही बसा..माझी जिंदगी दिष्टब झाली, आता काय डोंबल राहिलय… सोन्यासारख पोरग… माज फशविल त्याला…मुडद्यानी..

शारुख् – मी बघतोय ना काय होतंय…तू बोंबल्ल्याने काही होणारे का ??

गौरी ( तोंडावर चापटा मारत ) माय माय माय…आता मी बोंबलते… एवढच आयकायच राहिलेलं… वाटूळ झालं माझ्या जिंदगीच..ह्यो नटरंग्या काय नाय गेला जेलात… माज पोरग…रे..

करण – मी येतो …

मनोज शिंगुस्ते

Leave a comment