मत्सर | Jealousy

मत्सर | Jealousy –

“मत्सर” नेहमी आपले स्वतःचे स्वास्थ्य हरवायला कारण ठरतो . मत्सरामुळे द्वेष निर्माण होतो आणि द्वेषामुळे वैर निर्माण होते आणि वैर आपल्याला कायम संकटाकडे घेऊनजाते किंवा आपल्याला बेचैन करते . हा मत्सर Jealousy आपल्यात इर्षेमुळे निर्माण होतो, इर्षा तुलनेमुळे निर्माण होते आणि तुलना स्वतःचे चुकीचे मुल्यांकन केल्यामुळे तयार होते .

आपली स्वतःची किंमत ठरविल्याशिवाय आपण दुसऱ्याशी तुलना करूच शकत नाही. येथेच घोटाळा आहे. आपले मुल्य आपल्यालाच समजले नाही. जगात आपली दुसरी प्रतिकृती नाही . आपल्या प्रत्येकाला भगवंताने वैशिष्ट्यपूर्ण (स्पेशल ) निर्माण केलेले आहे . तुमच्या हाताच्या ठसे जगात दुसऱ्या कोणाचे नाहीत.

दुर्लभो मणुष्यो देहो ।
देहीनाम क्षणभंगुराः।
तत्रापि दुर्लभं मन्न
े वैकुंठप्रियदर्शनं।।

म्हणून आपण प्रत्येकजण अद्वितीय आहोत ,तसेच इतरही आहेत . त्यामुळे कोणालाही कमी समजू नका आणि स्वतःलाही कोणापेक्षा कमी समजू नका. जोपर्यंत आपण बाहेर बघायचे सोडून extroverted आत स्वतःत बघत नाही introverted तोपर्यंत आपली स्वतःची खरी किंमत आपल्याला कळत नाही . यालाच आत्मज्ञान म्हणतात आणि यालाच स्वस्वरूपाची ओळख म्हणतात . ही ज्याला होते तो कायमचा मत्सर विरहीत होतो . जोपर्यंत आपण दुसऱ्याची नक्कल (कॉपी) करायची सोडत नाही तोपर्यंत आपली स्वतःची अक्कल वापरत नाही .

कोणाही जीवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
तुकाम्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ।।

डॉ. आसबे ल. म.

Leave a comment