इला अडा | Kerala Style Ela Ada

By Snehal's Kitchen Corner Recipe Foods Video 1 Min Read

इला अडा | Kerala Style Ela Ada

केरळचा पारंपरिक पदार्थ आहे. कोकणात याला पातोळ्यासुद्धा म्हणतात.

साहित्य:
अर्धी वाटी गुळ, पाऊण वाटी खोवलेला नारळ, १ वाटी तांदळाचं पीठ, चिमूटभर मीठ, गरम पाणी, साजूक तूप, केळीची/हळदीची पाने

कृती:
१. प्रथम गुळ आणि खोवलेला नारळ एकत्र करून आणि ५ मिनिटे बाजूला ठेवावा.
२. कढईमध्ये १ चमचा साजूक तूप घेऊन त्यात गूळ आणि नारळाचे एकत्र केलेले मिश्रण टाकावे आणि गुळ वितळेपर्यंत परतून घ्यावे. साधारण ६-७ मिनिटे लागतात. त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यावे.
३. एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ, एक चमचा साजूक तूप टाकावे आणि एकत्र करून घ्यावे. वरून आवश्यकतेनुसार गरम उकलते पाणी घालून तांदळाच्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हाताने/चमच्याने एकत्र करून घ्यावे.
४. तांदळाच्या पिठाचे छोटे गोळे करून ते केळीच्या पानावर गोलाकार आणि पातळ पसरून घ्यावे. त्यात गूळ-नारळाचे मिश्रण ठेवावे. तांदळाच्या पिढीच्या समोरासमोरील कडा एकमेकांवर ठेवाव्यात आणि करंजीसारखा आकार द्यावा.
५. हे इला अडा आता १२-१५ मिनिटे केळीच्या पानात मोठ्या आचेवर उकडून घ्यावेत आणि साजूक तुपासोबत गरमागरम सर्व्ह करावेत.

अशाप्रकारे आपले इला अडा तयार!

Leave a comment