कोळंबी भजी
साहित्य:
छोट्या आकाराची अर्धा किलो कोळंबी, ४ चमचे रवा, १ तांदळाचे पीठ, १ चमचा लाल तिखट, २ चमचे मालवणी फिश मसाला, २ चमचे कोकम आगळ, मीठ, तेल
कृती:
१. प्रथम कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर एक भांड्यात घेऊन त्यात हळद, कोकम आगळ, मीठ घालून अर्धा तास मॅरीनेट करून घ्यावी.
२. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
३. एक प्लेटमध्ये रवा घ्यावा त्यात तांदळाचे पीठ, मालवणी फिश मसाला, मीठ, लाल तिखट घालून चांगले एकत्र करून घ्यावे.
४. नंतर मॅरीनेट केलेली कोळंबीला रव्यामध्ये घोळवून मंद आचेवर तळून घ्या आणि सर्व्हिग प्लेटमध्ये सर्व्ह करा.अशाप्रकारे आपली करकुरीत कोळंबी भजी तयार!
टीप: कोळंबी आकाराने लहान असेल तर भजी जास्त कुरकुरीत होतात.