कोळंबी फ्राय –
साहित्य:
कोळंबी, ४ मोठे चमचे फिश मसाला, २ मोठे चमचे लाल तिखट, हळद, मीठ, १ चमचा कोकम आगळ, तेल
वाटण:
५-६ मोठे कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, १ इंच आले, कोथिंबीर, तेल
कृती:
१. प्रथम कांदे बारीक चिरून तेलावर व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावेत.
नंतर त्यात लसूण, आले घालून २ मिनिट परतून गॅस बंद करावा आणि मिश्रण गार होऊ द्यावे.
२. गार झाल्यावर गरजेनुसार पाणी घालावे व त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. (हवी असल्यास कोथिंबीर घालू शकता)
३. एका पॅनमध्ये ४ मोठे चमचे तेल घेऊन त्यात वरील पेस्ट परतून घ्यावी. त्यात फिश मसाला, आवडीनुसार लाल तिखट आणि थोडी हळद घालावी. तेल सुटेपर्यंत हे मिश्रण बारीक आचेवर परतून घ्यावे.
४. मस्त तेल सुटायला लागल्यावर त्यात कोळंबी घालावी आणि परतून घ्यावे. आपोआप भाजीला पाणी सुटते त्यामुळे लागेल तसे हळू हळू पाणी घालावे.
५. वरतून कोकम आगळ/कोकम व मीठ घालावे व भाजीला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व बाऊलमध्ये कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावी.
अशाप्रकारे कोळंबी फ्राय/रस्सा तयार!
©Snehal Kalbhor
https://www.instagram.com/s_n_e_h_a_l_k