कुंडमळा

By Bhampak Places 4 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

कुंडमळा –

कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेले हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटे गाव. सुमारे २ किलोमीटरवर असलेला हा कुंडमळा. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या खडकांवर कोसळून पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. परिसरही खूपच निसर्गरम्य आहे.

भौगोलिक स्थान (Location) –

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून अगदी जवळ असल्याने स्वतःची गाडी असेल तर उत्तमच परंतु येथे जाण्यासाठी आपण मुंबई-पुणे महामार्गावरील ‘बेगडेवाडी’ स्टेशन येथे उतरून देखील ‘कुंडमळा’ येथे जाऊ शकता.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

तसे पहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये निघोज येथील रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत. या निघोज येथील रांजण खळग्यांंना सगळेच भेट देतात परंतु पुण्यापासून अगदी जवळ असलेले ‘कुंडमळा’ येथील इंद्रायणी नदी निर्मित रांजण खळगे आजही उपेक्षित आहेत. तसे पहायला गेले तर ‘कुंडमळा’ हे ‘इंदोरी’ आणि ‘शेलारवाडी’ या गावांच्या सीमेवर वसलेले ठिकाण आहे.

येथील खळगे मोठे जरी नसले तरी सुमारे ५०० मीटर अंतर विविध आकारातील रांजणखळगे पहाण्यास दिसतात. पावसाळ्यात येथे एकदातरी आवर्जुन जाण्यासारखे हे ठिकाण आहे. खरे तर महाराष्ट्र शासनाने अशा ठिकाणी पर्यटनाला वाव द्यायला हवा तेवढीच स्थानिक लोकांना रोजगाराची निर्मिती होईल. कुंडमळ्यातून दिसणारा घोरावडेश्वरचा डोंगर मस्तच दिसला. मागील बाजूला असलेला भंडारा डोंगर साद घालत होता.

‘कुंडमळा’ येथील रांजण खळगे पाहताना आपल्याला हे देखील समजून घेतले पाहिजे कि नदीमध्ये ‘रांजण खळगे’ कसे तयार होतात. जेव्हा नदीला पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा नदी ही आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणते तेव्हा त्या पाण्यासोबत नदी अनेक दगड आणि गोटे देखील आपल्या सोबत आणते. तसेच या नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमध्ये अनेक भोवरे निर्माण होतात. नदी मध्ये असलेल्या ‘कॉम्पॅॅक्ट बेसाॅॅल्ट’ या दगडामुळे नदीमध्ये हे भोवरे तयार होतात तेव्हा या भोवऱ्यामध्ये हे सगळे नदीने वाहून आणलेले दगड, वाळू, गोटे हे या भोवऱ्यामध्ये गोल गोल फिरायला लागतात. यामुळे नदीने आपल्या सोबत वाहून आणलेले वाळू, दगड-गोटे हे सगळे गोल गोल फिरून ‘कॉम्पॅॅक्ट बेसाॅॅल्ट’ याच्याशी होणाऱ्या घर्षणामुळे या रांजण खळग्यांची निर्मिती होते. या रांजण खळग्यांच्या निर्मितीला लाखो वर्षे लागतात. जसे जसे दरवर्षी नदी जे सगळे दगड-गोटे, वाळू वाहून आणते त्याच्याने या रांजण खळग्यांच्या आकारामध्ये वाढ होत जाते आणि ते अधिकाधिक मोठे मोठे दिसायला लागतात.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. बेगडेवाडी रेल्वेस्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण तळेगाव दाभाडेला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –

बामण डोह
घुमटी विहिर
पाचपांडव मंदिर
दाभाडे सरकार वाडा
इंदुरी गढी / किल्ला

लेखक – इंटरनेट.
माहिती संकलन – सायली निंबाळकर.
@Marathi Explorer

Leave a comment