लिपस्टिक

By Digvijay Vibhute Articles 2 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

लिपस्टिक

काल व्हाॅटस्अप वर अचानक एका मैत्रिणीचा मेसेज आला.
मैत्रीण : Hiii , काय करतोय?
मी : नेहमीप्रमाणे निवांत बसलोय..
मैत्रीण : ऐक ना..
मी : बोल..
मैत्रीण : Suppose की तुझी बायकोने डार्क कलर ची लिपस्टिक लावली.. तर काय करशील?
मी : असं का विचारतेय अचानक?
मैत्रीण : सांग आधी काय करशील?
मी : मी कशाला काय बोलेन?
मैत्रीण : ओह्ह.. म्हणजे आवडेल तुला..
मी : जर तिला शोभुन दिसत असेल तर काय हरकत आहे, लावली तर लावली..
मैत्रीण : आणि जर खराब दिसत असेल तर?
मी : मग मी तिला सांगेन की तुला डार्क लिपस्टिक शोभत नाहि.. दुसऱ्या शेडस् ट्राय कर..
मैत्रीण : तरी पण तिने ऐकलं नाहि तर?
मी : तिची इच्छा… खरंतर प्रत्येकाला कळत असतं की आपल्याला काय शोभेल आणि काय नाहि ते.. कारण सुंदर दिसायची हौस प्रत्येकाला असते..
मैत्रीण : बर हे माझे फोटो बघून सांग की मला डार्क लिपस्टिक शोभते का?
मी : मी पाहिलेत हे फोटो फेसबुक वर.. छान दिसतेस तु डार्क लिपस्टिक मधे..
मैत्रीण : Thank you..
मी : पण असं का विचारतेय ते सांग की..
मैत्रीण : अरे एक friend आहे, तो बोलतोय की डार्क लिपस्टिक लावणाऱ्या मुली त्याला काॅल गर्ल वाटतात.. मी खुप भांडले त्याच्याशी.. कसे विचार करतात ना लोक.. cross check करावं वाटलं म्हणून तुला विचारलं.. पण तु चांगलं बोलला.. Thank you..
मी : तुझ्या त्या फ्रेंड ला सांग की “देखने का नझरिया बदलो जनाब, सुंदरता तो देखनेवालेकी आंखो मे होती है..”
मैत्रीण : हो.. मी त्याला आपले चॅटिंग काॅपी करून सेंड केले.
मी : Ok.. चल Bye..
मैत्रीण : सी यु.. आणि Thank you once again..
Leave a comment