प्रेम जपा!

By Bhampak Articles Sameer Khan 1 Min Read
bhampak-banner

प्रेम जपा-

श्रीकृष्णाने राधावर प्रेम केले, मिराने कृष्णावर.. मात्र कृष्णाला प्राप्त  करण्याचे  भाग्य  रूक्मिणीचे  होते, तिला  कृष्ण प्राप्त होऊनही  पुर्ण फक्त तिचाच तो झाला नाही तर राधेने त्याला गमावूनही तो तिच्यापासून विलग होऊच शकला नाही. ईतकं की  जसा  हवेत  सुगंध मिसळताना  दोहोंचे अस्तित्व विलग राहत नाही अगदी तसंच. मिराची व्यथा तर याहूनही वेगळी!! स्वतः राजकन्या अजून भोजराजसारख्या वराने वरल्यावरही विरक्त जोगन बनून हरीनामातच  रममाण       झालेली !!   विषाची  परीक्षा देऊनही   ऊरलेली   तरीही   केवळ एका फुलांत सामावलेली अशी मिरा . असं असतं प्रेम!! ज्याला कसल्याच व्याख्येची आवश्यकता भासत नाही.

कधी कधी माणसाला असं प्रेम लाभतं पण ते त्याला कळत नाही. कधी कळलंच तरी तो ते स्विकारत नाही त्याचं चित्त नेमकं दुसरीकडेच असतं जे त्याच्या आवाक्याबाहेर असतं. कधी तो असं प्रेम त्याला देऊ करतो जो हे स्विकारण्यासच तयार नसतो. भाग्याने असा जोडीदार लाभलाच तर नियतीला ते मान्य नसते. प्रेमाला विरहाचा शाप आधीपासूनच आहे. कधी तो ठराविक  दिवसांसाठी असतो तर कधी   आयुष्यभरासाठी…..!!! पोस्ट चा ऊद्देश एकच, जपा.. आपल्या आयुष्यातील आपल्यावर प्रेम करणारी माणसं जपा.. मग ते कुणीही असो.

समीर खान

Leave a comment