मँगो चॉकलेट फालुदा

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 1 Min Read
mango-chocolate-faluda

मँगो चॉकलेट फालुदा

साहित्य:
आमरस/आंब्याचा गर, चॉकलेट sauce, शेवया, व्हॅनिला आईसक्रीम, सब्जा, पाणी, चेरी

कृती:
१. प्रथम २ चमचे शेवया घेऊन त्या पाण्यात उकळून घ्याव्यात.

२. एक चमचा सब्जा बी एक तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात.

३. एक काचेच्या ग्लासमध्ये सगळ्यात खाली थोडा चॉकलेट sauce टाकावा. त्यावर उकळलेल्या शेवया घालाव्यात. नंतर आमरसचा थर द्यावा. त्यावर भिजवलेला सब्जा घालावा. पुन्हा थोडा आमरस घालून घ्यावा. नंतर चॉकलेट sauce घालावा. वरती एक स्कुप व्हॅनिला आईसक्रीम आणि त्यावर चॉकलेट sauce ने गार्निश करावे. सगळ्यात शेवटी चेरी लावून सर्व्ह करावे.

अशाप्रकारे मँगो चॉकलेट फालुदा खाण्यासाठी तयार!

वेळ: अर्धा तास

Leave a comment