मँगो कस्टर्ड | Mango Custard –
साहित्य:
१ आंब्याचा गर, अर्धा लिटर दूध, ४ चमचे कस्टर्ड पावडर (मँगो/व्हॅनिला फ्लेवर), ८-१० चमचे साखर
कृती:
१. प्रथम एका पातेल्यात दूध घेऊन त्याला एक उकळी येऊन द्यावी.
२. एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात अर्धा कप थंड दूध घालावे आणि पेस्ट बनवून घ्यावी.
३. दुधाला उकळी आल्यावर त्यात हळू हळू कस्टर्ड पावडरची तयार केलेली पेस्ट घालावी, आवडीनुसार साखर घालावी आणि सतत ढवळत राहावे.
४. ५-६ मिनिटे मंद गास वर शिजवून झाले की गॅस बंद करून तयार झालेलं कस्टर्ड थंड करून द्यावे. थंड झाले की त्यात आंब्याचा गर टाकावा आणि २०-२५ मिनिटे फ्रीजमध्ये सेट करून घ्यावे.
५. एका बाउलमध्ये तयार केलेले थंडगार मँगोकस्टर्ड घ्यावे, त्यात वरतून आंब्याच्या फोडी घालून सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपले मँगो कस्टर्ड तयार!
– स्नेहल काळभोर